Home | International | China | Chinese Men Abduct Underage Vietnamese Girls To Sell Them As Brides

Child Brides: येथे भर बाजारातून पळवून नेल्या जातात अल्पवयीन मुली, चीनला दोष

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 26, 2018, 05:42 PM IST

गायब होणाऱ्या मुलींचे वय 13 वर्षे किंवा त्याहून कमी आहेत. त्या सगळ्या ब्राइड ट्रॅफिकिंगच्या शिकार होत आहेत.

 • Chinese Men Abduct Underage Vietnamese Girls To Sell Them As Brides

  इंटरनॅशनल डेस्क - व्हिएतनामचे एक दुरस्थ शहर अल्पवयीन मुली आणि तरुणींच्या गायब होण्यावरून चर्चेत आहे. गायब होणाऱ्या मुलींचे वय 13 वर्षे किंवा त्याहून कमी आहेत. त्या सगळ्या ब्राइड ट्रॅफिकिंगच्या शिकार होत आहेत. अर्थात शेजारील राष्ट्र चीनचे लोक या मुलींना पळवून त्यांचे बळजबरी विवाह लावून देत आहेत. या मुलींना भर बाजारातून पळवून नेऊन विकले जात आहे. फोटोग्राफर व्हिंसेन्ट ट्रिमेयु यांनी बाल अधिकारांसाठी झटणाऱ्या प्लॅन इंटरनॅशनच्या क्रिस्टी कॅमरन यांच्यासोबत व्हिएतनाम दौरा केला. यावेळी त्यांनी या रिमोट टाऊनच्या लोकांची भेट घेतली.

  > बाल अधिकारासाठी काम करणाऱ्या प्लॅन इंटरनॅशनलच्या माहितीनुसार, व्हिएतनाममध्ये फोर्स्ड मॅरेज अर्थात जबरदस्तीने विवाह करण्याचे प्रमाण वाढत आहे.
  > चीनने कित्येक दशक एक मूल धोरण राबवल्याने तेथील समाजात फक्त मुलांनाच प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे, चीनमध्ये मुलींचा तुटवडा निर्माण झाला.
  > लग्नासाठी मुलीच सापडत नसल्याने त्यांनी शेजारील देशांवर डोळा ठेवला. अशात व्हिएतनाम चीनचा सॉफ्ट टार्गेट ठरला. त्यातूनच ब्राइड ट्रॅफिकिंगचे चलन सुरू झाले.
  > केवळ अविवाहित अल्पवयीन मुलीच नव्हे, तर विवाहित तरुण महिलांमध्ये सुद्धा या प्रकरांमुळे भिती बसली आहे. अनेक महिला आपल्या पतीला सोबत घेतल्याशिवाय बाहेर पडत नाहीत.

  असे अडकवतात...
  > येथील मुलींचे आयुष्य अतिशय विकट आहे. ब्राइड ट्रॅफिकर्स मुली पळवण्यासाठी कित्येक महिने त्या गावात जाऊन राहतात. मुलींचा विश्वास जिंकून त्यांच्यासोबत मैत्री करतात. मग, प्रेमाचे सोंग करून त्यांना अडकवले जाते.
  > जेव्हा मुलीला पूर्णपणे विश्वास बसतो, तेव्हा ते मुलींना आपल्यासोबत चीनला घेऊन जाण्याचे आणि तेथे चांगली नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देतात. पण, व्हिएतनामची सीमा ओलांडताच तोंडावर पट्टी आणि हात-पाय बांधून एजंट्सच्या हवाली केले जाते.
  > अशाच एका टोळीची शिकार ठरलेली 18 वर्षीय तरुणी दिन्ह हिने सांगितल्याप्रमाणे, एका तरुणाने तिला अशाच प्रकारची आश्वासने देऊन चीनला नेले. त्यावेळी ती फक्त 15 वर्षांची होती.
  > ग्राहकांना दाखवण्यासाठी तिचे काही फोटोज काढण्यात आले आणि तिला एका खोलीत डांबण्यात आले. 8 महिने कैदेत राहिल्यानंतर तिने स्वतःची सुटका करून घेतली. पण, तिची मैत्रिण अद्याप परतलेली नाही.
  > अधिकृत आकडेवारीनुसार, जानेवारी 2017 पासून मार्च 2018 पर्यंत अशा अपहरणांची 300 प्रकरणे समोर आली आहेत. पण, बाल हक्क संघटनांनी हा आकडा 8000 हून अधिक असल्याचा दावा केला आहे.

  पुढील स्लाइड्सवर पाहा, व्हिएतनामच्या त्या गाव, शहराचे आणखी काही फोटो...

Trending