Home | International | China | Chinese President Secret Life, Xi Jinping Lived In Caves was A Mine Worker

गुहेत राहून खाणकाम करणारा मजूर असा बनला चीनचा सर्वात बलाढ्य नेता

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 13, 2018, 12:01 AM IST

चीनच्या संसदेने वादग्रस्त घटनादुरुस्तीला मंजुरी देत शी जिनपिंग यांना देशातील सर्वात शक्तीशाली नेता बनवले आहे.

 • Chinese President Secret Life, Xi Jinping Lived In Caves was A Mine Worker

  स्पेशल डेस्क - चीनच्या संसदेने वादग्रस्त घटनादुरुस्तीला मंजुरी देत शी जिनपिंग यांना देशातील सर्वात शक्तीशाली नेता बनवले आहे. नवीन कायद्यानुसार, विद्यमान राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आयुष्यभर राष्ट्राध्यक्ष पदी राहू शकतात. या कायद्यात एखाद्या व्यक्तीला राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्यासाठी 2 वेळेसची मर्यादी काढण्यात आली आहे. असे करून शी जिनपिंग आता चीनचे पितामाह आणि सर्वात शक्तीशाली नेते माओत्से तुंग यांच्या बरोबरीचे झाले आहेत. शी जिनपिंग एकेकाळी गुहेत राहायचे. तसेच ते खाणकाम करणारे सामान्य मजूर होते. ते राष्ट्राध्यक्ष कसे बनले यासंदर्भातील काही तथ्य आम्ही वाचकांसाठी घेऊन आलो आहोत.


  कोण आहेत शी जिनपिंग?
  शी जिनपिंग यांनी खाणकाम मजूर ते राष्ट्राध्यक्ष पर्यंतचा खडतर प्रवास केला आहे. 1953 मध्ये जन्मलेले शी स्वतंत्र चीनमध्ये जन्मलेले पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत. स्वातंत्र्य लढ्यात सक्रीय सहभागी राहिलेले त्यांचे वडील शी जोंगशुन 1962 मध्ये माओ सरकारमध्ये उप-पंतप्रधान होते. ज्या वयात मुले शिक्षणावर लक्ष देतात, त्या वयात शी जिनपिंग यांना गावाकडे पाठवण्यात आले. लहानपणी खाणकाम करणारे शी एक केमिकल एंजिनिअर बनले. मात्र, त्यांचे खासगी आयुष्य नेहमीच गुप्त ठेवण्यात आले आहे. त्यांची मुलगी सुद्धा नाव बदलून 24 तास सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात राहते. तर त्यांच्या पत्नी एक प्रसिद्ध चिनी गायिका आहेत.

  पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, गुहेत राहणारा मजूर असा बनला चीनचा सर्वात शक्तीशाली नेता...

 • Chinese President Secret Life, Xi Jinping Lived In Caves was A Mine Worker

  काम करण्यासाठी शी यांच्या वडिलांनी त्यांना गावात पाठवले. सांस्कृतिक क्रांतीच्या वेळी वयाच्या 15 व्या वर्षी ते जियांगडीन प्रांतात गेले. या ठिकाणी ते कोळसा खाणींमध्ये मजूर म्हणून काम करायचे. तसेच गुहेत राहून त्यांनी कित्येक वर्षे काढली आहेत. गंभीर आणि प्रामाणिक स्वभाव असल्याने ते जवळपासच्या लोकांमध्ये सर्वांच्या आवडते होते. गावात राहून काम करणे हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता असे त्यांनी मुलाखतींमध्ये मान्य केले. 

 • Chinese President Secret Life, Xi Jinping Lived In Caves was A Mine Worker

  बीजिंगच्या शिनहुआ विद्यापीठातून त्यांनी केमिकल एंजिनिअरिंगची पद्वी पास केली. चीन अमेरिकेचा विरोधक असला तरीही शी जिनपिंग यांनी 1985 मध्ये आपले संशोधनाचे काम अमेरिकेतील आयोवा स्टेट विद्यापीठातून केले आहे. एवढेच नव्हे, तर त्यांनी आपल्या मुलीला शिकण्यासाठी अमेरिकेतच पाठवले आहे. 

 • Chinese President Secret Life, Xi Jinping Lived In Caves was A Mine Worker

  शी जिनपिंग आज कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख असले तरीही एकेकाळी त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वासाठी 9 वेळा अर्ज केले होते. प्रत्येकवेळा त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला होता. 1974 मध्ये त्यांनी पक्षाच्या लोकल पार्टी सचिव पदाची जबाबदारी स्वीकारली. 

 • Chinese President Secret Life, Xi Jinping Lived In Caves was A Mine Worker

  यानंतर फूजियान आणि झेंझियांग प्रांतात त्यांनी वरिष्ठ पदांवर पक्षासाठी काम केले. पक्षात राहून त्यांनी चीनमध्ये जास्तीत-जास्त परदेशी गुंतवणूक मिळवण्यासाठी काम केले. यानंतर 2000 मध्ये त्यांनी फूजियानचे गव्हर्नर असताना तैवानकडून गुंतवणूक मिळवली. तैवानच्या प्रत्येक उद्योजकाशी त्यांनी उद्योजक म्हणूनच भेट घेतली. कित्येक दिवसानंतर त्या गुंतवणूकदारांनी टीव्ही पाहिला आणि त्यांची भेट उद्योजकाशी नाही, तर चीनच्या गव्हर्नरशी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. 

 • Chinese President Secret Life, Xi Jinping Lived In Caves was A Mine Worker

  जिनपिंग यांच्या कुटुंबियांची खूप कमी माहिती माध्यमांसमोर येते. तरीही त्यांची पत्नी पेंग लीयुआन कुटुंबातील सर्वात लोकप्रिय व्यक्ती आहे. त्या अभिनेत्री आणि पॉप सिंगर आहेत. त्या पीपल्स लिबरेशन आर्मी बॅन्डमध्ये मेजर जनरल आहेत. 

 • Chinese President Secret Life, Xi Jinping Lived In Caves was A Mine Worker

  शी जिनपिंग-लीयुआन यांची मुलगी सर्वांसाठी एक रहस्य आहे. अमेरिकन माध्यमांच्या वृत्तानुसार, तिचे नाव शी मिंगजी असून ती हार्वड विद्यापीठात शिकत आहे. यानंतर ती नाव बदलून 24 तास सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात राहते असेही वृत्त प्रसारित झाले होते.

   

 • Chinese President Secret Life, Xi Jinping Lived In Caves was A Mine Worker

  भ्रष्टाचार विरोधात शी यांनी पुकारलेल्या देशव्यापी मोहिमांची जगभरात चर्चा झाली. पण, त्यांच्या कुटुंबांवर सुद्धा 2030.4 कोटींच्या कंपन्यांमध्ये भागिदारी आहे. हाँगकाँगमध्ये त्यांच्या कुटुंबियांच्या 302 कोटी रुपयांच्या 7 प्रॉपर्टी आहेत. ब्लूमबर्ग वेबसाइटवर हे वृत्त आले होते. यानंतर चीनने ही वेबसाइट देशात ब्लॉक केली. 

Trending