आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीजिंग - अन्नाची थाळी नेहमीच अर्धवट खाऊन सोडणारी 11 वर्षीय चिमुकली झेनझेन आता पोटभर जेवते. तेही कुठलीही तक्रार न करता. रोजच्या तुलनेत थोडेसे अधिक जेवून आणि कसेही करून तिला आपले वजन वाढवायचे आहे. कारण, डॉक्टरांनी तिला सांगितले आहे. तुला आपल्या बाबांचा जीव वाचवायचा असेल तर नीट जेवण करून वजन वाढवावेच लागेल. कधी-कधी तिला जेवणाचा कंटाळा देखील येतो. पण, डॉक्टरांनी सांगितलेले लक्षात येताच ती सगळ्याच तक्रारी विसरते.
हे आहे कारण...
- चीनचे लुओ चांगमिंग यांनी 2016 मध्ये अॅक्युट मायलोइड ल्युकेमिया (रक्ताच्या कॅन्सरचा प्रकार) असल्याचे निष्पन्न झाले.
- पाण्यासारखा पैसा वाहून उपचार केले. फक्त कीमोथेरेपीवर 21 लाखांहून अधिक रुपये खर्च केले. पण, आता त्यांचे कॅन्सर पुन्हा परतले आहे.
- डॉक्टरांनी लुओ चांगमिंग यांना वाचवण्यासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा एकच पर्याय उरल्याचे स्पष्ट केले. त्याच दिशेने डोनरचा शोधही सुरू झाला.
- डॉक्टरांनी बोन मॅरो दान करणारी व्यक्ती रक्ताच्या नात्याचीच असावी अशी अट ठेवली. लुओ यांची बहिण बोन मॅरो देण्यासाठी वेळीच तयार झाली. पण, तिचे वय जास्त असल्याने डॉक्टरांनी तिला नकार दिला.
- साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट आणि चेंगडू कमर्शियल डेलीच्या वृत्तानुसार, लुओ यांच्या 11 वर्षीय मुलीला याची माहिती मिळाली तेव्हा ती वेळीच तयार झाली.
- आपल्या वडिलांसाठी ती काहीही करण्यास तयार होती. पण, डॉक्टरांनी तिचा बोन मॅरो घेण्यास नकार दिला. बोन मॅरो देण्यासाठी तू अशक्त आहेस असे तिला सांगण्यात आले.
- वयाच्या 11 व्या वर्षी तिचे वजन फक्त 29 किलोग्रॅम आहे. वडिलांचा जीव वाचवण्यासाठी तुला वजन वाढवावे लागेल असे तिला सांगण्यात आले.
- तेव्हापासून तिने अर्धवट जेवणाचे सगळेच सोंग बंद केले. तिच्या या प्रयत्नांना आता यश येत आहे. एका महिन्यातच तिने आपले वजन वाढवून 34 किलोंवर नेले आहे. आता डॉक्टरांनी तिचा बोन मॅरो घेण्यासाठी होकार दिला असून तशी तयारी देखील सुरू केली.
पुढील स्लाइड्सवर पाहा, या बाप-लेकीच्या भावना व्यक्त करणारे काही फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.