आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक राष्ट्रपतींसोबत मोदींचा Handshake; म्हणाले, शेजाऱ्यांशी संपर्क वाढवणे हाच हेतू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शांघाय - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायजेशन (एससीओ) समिटच्या दुसऱ्या दिवशी वेलकम सेरेमनीत सहभाग घेतला. या ठिकाणी पोहोचलेले पाकिस्तानचे राष्ट्रपती ममून हुसैन यांच्याशी मोदींनी हॅन्डशेक केला. तर, दुसरीकडे त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचीही भेट घेतली. या दोन्ही नेत्यांसोबत हस्तांदोलन करताना मोदींनी फोटोसेशन केले. यानंतर एससीओच्या 8 सदस्य देशांच्या नेत्यांसोबत ग्रुप फोटोमध्ये सहभाग घेतला. जिनपिंग यांनी मर्यादित सत्रापूर्वी उर्वरीत नेत्यांना मेजवानी देखील दिली. यावेळी मोदींनी प्लेनरी सेशनमध्ये भारतात केवळ 6% पर्यटक एससीओ देशांतून येतात. त्यामध्ये वाढ होऊ शकते असे मत व्यक्त केले. 

 
काय म्हणाले मोदी..?
- मोदींनी प्लेनरी सेशनमध्ये सांगितले, "अफगाणिस्तान दहशतवादाच्या प्रभावाखाली जगणारे दुर्दैवी उदाहरण आहे. तसेच भारतात एससीओ देशातून येणाऱ्या परदेशी पर्यटकांचे प्रमाण 6 टक्के आहेत. त्यामध्ये दुपटीने वाढ होऊ शकते. आपल्या संस्कृतींविषयी जागृकता वाढवून असे करता येईल." 

- "आम्ही भारतात एससीओ देशांसाठी एक फूड फेस्टिव्हल आणि एक बौद्ध फेस्टिव्हल आयोजित करणार आहोत. आपण पुन्हा एका मंचावर आलो. ज्या ठिकाणी भौतिक आणि डिजिटल संपर्क भौगौलिक परिभाषेला बदलत आहे. त्यामुळे, शेजारील देशांसोबत संपर्क वाढवणे ही आमची प्राथमिकता आहे."


2019 मध्ये भारतात येणार शी जिनपिंग
तत्पूर्वी शनिवारी मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचीही भेट घेतली. गेल्या दोन महिन्यात मोदी आणि शी यांची ही दुसरी भेट आहे. यापूर्वी मोदींनी अनौपचारिक चीन दौऱ्यात त्यांची भेट घेतली होती. मोदींनी शनिवारच्या बैठकीत चीनसोबत दोन महत्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. ते करार ब्रह्मपुत्रा आणि शेती संदर्भातील होते. या करारानुसार, चीन ब्रह्मपुत्राच्या पात्रातून पाणी सोडण्यापूर्वी भारताला माहिती देणार आहे. सोबतच चीनने बासमती तांदळासह इतर प्रकारचे तांदूळ खरेदी करण्यास सहमत आहे. परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितल्याप्रमाणे, शी जिनपिंग 2019 मध्ये भारत दौऱ्यावर येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...