आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भररस्त्यावर आपले दूध विकतेय ही आई; एक बाळ ICU मध्ये, दुसरे हातात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - चीनमध्ये सोशल मीडियावर एका आईचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक आई आपल्या बाळाला हातात धरून आहे. भर रस्त्यावर बाळ आणि पतीसह थांबलेली ही महिला आपल्याच छातीचे दूध विकत आहे. मन हेलावून सोडणारी ही घटना पाहून लोकांनी गर्दी केली. तेव्हा पतीनेच आपली पत्नी असे का करत आहे याचे कारण सांगितले. ती आपले दूध विकून आपल्या बाळाच्या हॉस्पिटलचे बिल फेडण्यासाठी निधी उभारत होती.

   

- चीनचे प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सिना वीबोवर हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला. कोट्यधी लोकांनी पाहिला आहे. तसेच 5000 हून अधिक लोकांनी त्यावर आपल्या भावना मांडल्या आहेत. 
- व्हिडिओमध्ये तिच्या बाजूलाच एक फलक घेऊन तिचा पती थांबला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मुलांपैकी एकाला हॉस्पिटलच्या आयसीयू वार्डात दाखल करण्यात आले आहे. 
- रुग्णालयाने त्यांच्या माथी 10 लाखांचे बिल फाडले आहे. त्या मुलावर पुढील उपचार करण्यासाठी किंवा त्याला उपचारानंतर डिस्चार्ज मिळवण्यासाठी त्यांना हॉस्पिटलचे बिल भरावेच लागेल असे रुग्णालयाने सांगितले. 
- पण, आपल्याकडे तेवढे पैसे नसल्याने आईने आपल्या दूध पिणाऱ्या बाळाला रस्त्यावर आणून आपलेच दूध विकण्यास सुरुवात केली. 
- सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असताना अनेक लोक त्यांच्या मदतीची तयारी दाखवत आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...