एक लेकरु 250 / एक लेकरु 250 किलोंचे, दुसरे ऑटिस्टिक; 20 वर्षांपासून आई करतेय सांभाळ

दिव्य मराठी वेब टीम

Apr 03,2018 06:04:00 PM IST

इंटरनॅशनल डेस्क - ही व्यथा एका अशा मातेची आहे जिच्या जुळ्यांपैकी एक मुलगा ऑटिस्टिक तर दुसरा मुलगा सेरेब्रल पाल्सीमुळे अतीलठ्ठ झाला आहे. गेल्या 20 वर्षांपासून ती या दोन्ही मुलांची लहान लेकरुंप्रमाणे देखरेख करत आहे. तिचा दुसऱ्या मुलाचे वजन तब्बल 250 किलो आहे. तो आपल्या जागेवरून उठणे तर दूरच मदतीशिवाय कूस सुद्धा बदलू शकत नाही. या दोघांचा सांभाळ करण्यासाठी तिला नोकरी देखील सोडावी लागली आहे.

- 50 वर्षीय झिकिऊ यांनी 24 वर्षांपूर्वी जुळ्या मुलांना जन्म दिला होता. ते दोघेही अपरिपक्व जन्मले होते. मुलांच्या आरोग्याबद्दल ऐकूण पती डिप्रेशनमध्ये गेला आणि झिकिऊला घटस्फोट देऊन वेगळा झाला.
- घरात या दोघांचा सांभाळ करण्यासाठी कुणीच नसल्याने तिला आपली चांगली नोकरी गमवावी लागली. ती आता फुलटाइम मुलांचा सांभाळ करत आहे.
- तिचा एक मुलगा सेरेब्रल पाल्सी आणि ऑटिस्टिक आहे. सेरेब्रल पाल्सी अशी अवस्था आहे, ज्या माणसाचे वजन झपाट्याने अवाढव्य वाढते. त्यामुळेच एका मुलाचे वजन तब्बल 250 किलोंवर पोहोचले आहे.
- आईने सांगितल्याप्रमाणे, तिचा मोठा मुलगा आपल्या जागेवरून हालचाल सुद्धा करू शकत नाही. तो फक्त बोलू शकतो. चीनच्या लियोनिंग प्रांतात ती आपल्या दोन्ही मुलांची काळजी घेत आहे.
- तिचा छोटा मुलगा एक चांगला गायक आहे. देशभर विविध ठिकाणी तो गायनाच्या स्पर्धांमध्ये भाग घेतो. इटालियन आणि रशियन गीतांमध्ये त्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
- इतक्या कठिण परिस्थितीतही ती आपल्या मुलांसोबत खुश आहे. मोठ्या मुलाची काळजी घेताना छोटा नेहमीच मदत करतो. आपली दोन्ही मुलं खूप सुंदर असल्याचे ती सांगते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या कुटुंबियांचे आणखी काही फोटो...

X
COMMENT