7 वर्षांत प्रथमच / 7 वर्षांत प्रथमच देशाबाहेर निघाला हुकूमशहा, समोर आले PHOTOS

दिव्य मराठी वेब टीम

Mar 28,2018 02:58:00 PM IST

इंटरनेशनल डेस्क - जगातील सर्वात एक्कलकोंडा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांचा चीन दौरा चर्चेत आहे. 2011 मध्ये देशाचे नेतृत्व सांभाळले तेव्हापासून किम जोंग उन यांचा हा पहिला परदेश दौरा आहे. ते आपल्या पत्नीसह 4 दिवसांच्या चीन दौऱ्यावर गेले आहेत.

चीन आणि रशिया वगळता अमेरिका, युरोपियन युनियन, ब्रिटन आणि अख्ख्या जगाच्या निर्बंधांना उत्तर कोरिया सामोरे जात आहे. अशात आपला एकमेव मित्र राष्ट्र चीनचे नुकतेच सर्वोच्च नेते झालेले शी जिनपिंग यांची भेट घेणे उत्तर कोरियासाठी अतिशय महत्वाचे होते. शी जिनपिंग यांची भेट घेतल्याने आणि एकूणच चीनशी संबंध वाढवल्याने जगाच्या संपर्कात येण्याचे मार्ग मोकळे होतील असे आता किम जोंग उन यांच्या लक्षात आले आहे. कदाचित त्यामुळेच, त्यांनी 7 वर्षांत पहिला परदेश दौरा करण्यासाठी चीनची निवड केली. तसेच आपल्यावर ज्यासाठी निर्बंध लादण्यात आले आहेत, त्या अण्वस्त्र चाचण्या सुद्धा बंद करण्याचे आश्वासन दिले.

वडिलांप्रमाणे ट्रेन घेऊन आले...
चीनची सरकारी वृत्तसंस्था शिनहुआने किम आणि शी यांच्या हस्तांदोलनाचा एक फोटो जारी करताना या भेटीच्या वृत्तास अधिकृत दुजोरा दिला. त्यातच जपानी आणि पाश्चिमात्य माध्यमांनी उत्तर कोरियन घराण्याची एक ट्रेन चीनला पोहोचल्याचे वृत्त दिले होते. ती खरोखर किम यांचीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. 2011 मध्ये किम जोंग उन यांचे वडील किम जोंग इल सुद्धा रशिया आणि चीनला ट्रेन घेऊन पोहोचले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सपत्निक चीन दौऱ्यावर असलेले किम जोंग उन यांचे आणखी काही फोटो...

X
COMMENT