Home | International | China | Old Man Fears To Die Lonely Emotionally Appeals For His Own Adoption

मला दत्तक घ्या, एकटे मरण्याची भिती वाटते; 80 वर्षीयाची भावनिक अपील

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 07, 2018, 10:25 AM IST

आयुष्याच्या शेवटच्या क्षणी एकटे राहणे काय असते याचा अंदाज या 85 वर्षीय वृद्धाला पाहून नक्कीच येईल.

 • Old Man Fears To Die Lonely Emotionally Appeals For His Own Adoption

  इंटरनॅशनल डेस्क - आयुष्याच्या शेवटच्या क्षणी एकटे राहणे काय असते याचा अंदाज या 85 वर्षीय वृद्धाला पाहून नक्कीच येईल. चीनच्या बस आणि सार्वजनिक ठिकाणी त्यांनी जाहिरात चिटकवल्या आहेत. यामध्ये त्यांनी आपल्याला एकटे मरण्याची भिती वाटते. त्यामुळे, कुणी तरी दत्तक घ्यावे अशी विनंती केली आहे. या वृद्धावर ही वेळ कशी आली यासंदर्भातील स्टोरी सध्या व्हायरल होत आहे. एका माध्यमाला त्यांच्या कथित मित्राने सांगितल्याप्रमाणे, मार्चमध्ये त्याचा मृत्यू झाला.


  व्हायरल होतेय कहाणी...
  - या वृद्ध व्यक्तीचे नाव हान जीचेंग आहे. त्यांनी पांढऱ्या रंगाच्या कागदावर निळ्या शाईने जाहिरात लिहिली आहे. यात कुणी तरी मला दत्ताक घ्या अशी विनंती त्यांनी केली.
  - त्यांनी लिहिले, की मी एका छोटाशा घरात राहतो. पण, या घरात एकटे मरण्याची भिती वाटते. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार ते पुढे म्हणाले, मी 80 वर्षांचा असून एकटाच राहतो. मी आपल्यासाठी सामान खरेदी करू शकतो. स्वयंपाक करू शकतो आणि स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकतो.''
  - ते तियानजीनच्या सायंटिफिक रिसर्च इंस्टिट्युटमधून रिटार झालेले माजी वैज्ञानिक आहेत. त्यांना महिन्याला 950 डॉलर (जवळपास 64 हजार रुपये) पेंशन मिळत आहे.
  - हान यांनी पुढे लिहिले, मला नर्सिंग होमला जायचे नाही. एखादी दयावान व्यक्ती मला दत्तक घेईल अशी अपेक्षा करतो. ती व्यक्तीच माझी काळजी घेईल आणि माझ्यावर अंत्यसंस्कार देखील करेल.


  मुलगा परदेशात वसला
  - त्यांनी सांगितल्याप्रमाणे, पत्नीचा मृत्यू झाला आहे. तसेच परदेशात गेलेला मुलगा संपर्कात नाही. मी खूप रागीट स्वभावाचा होतो. त्यामुळे, मला सगळेच सोडून गेले.
  - हान यांचा मुलगा 2003 मध्ये कॅनडात शिफ्ट झाला. तेव्हापासून आतापर्यंत त्या मुलाशी संपर्क झालेला नाही. त्यांनी आपली तुलना एका फुलाच्या झाडासोबत केली. त्या झाडावर जोपर्यंत फुले राहतील तोपर्यंत तो सर्वांना आवडतो. नंतर लोक ते झाड सोडून जातात.


  ज्याची भिती होती तेच घडले...
  - हान यांनी कहाणी सर्वप्रथम एका स्थानिक माध्यमाने दाखवली. यानंतर त्यांची गोष्ट देशभर व्हायरल झाली. त्यांच्याबद्दल कळाल्यानंतर अनेक फोन आले. लोकांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला.
  - एक लोकल रेस्त्रॉ त्यांना जेवण देते. त्यांनी 20 वर्षीय विद्यार्थी जियांग जिंग याच्याशी मैत्री सुद्धा केली. तो रोज त्यांच्याशी बातचीत करतो.
  - मात्र, एकेदिवशी जियांगचा कॉल कुणीच उचलला नाही. यानंतर समोरून एका व्यक्तीने फोन उचलला तो त्या वृद्धाचा मुलगा होता. त्याने जियांगला फोन करून सांगितले, की 17 मार्च रोजीच त्यांचा मृत्यू झाला.


  घरी घेऊन जाण्यासाठी आला होता मुलगा
  - त्यांच्या शेजाऱ्यांना सुद्धा त्यांच्या मृत्यूची माहिती नव्हती. शेजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांचा मुलगा आपल्या वडिलांना कॅनडाला घेऊन जाण्यासाठी आला होता. त्याने आपल्या वडिलांची जाहिरात वाचली होती. तेव्हापासून तो खूप दुखी होता.
  - तो आपल्या वडिलांना यापूर्वीही घरी घेऊन जाण्यासाठी आला होता असे त्याने सांगितले. पण, हान तयार झाले नाहीत. त्यांनी आपल्या मुलासोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला. यानंतर त्यांनी आपल्या मुलाशी संपर्क सुद्धा तोडला. हान गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्यामुळेच, त्यांचा मृत्यू झाला. पण, काही माध्यम हा दावा मान्य करत नाहीत.


  पुढील स्लाइड्वर पाहा, हान यांचे त्या छोटाशा घरातील काही फोटो...

 • Old Man Fears To Die Lonely Emotionally Appeals For His Own Adoption
 • Old Man Fears To Die Lonely Emotionally Appeals For His Own Adoption
 • Old Man Fears To Die Lonely Emotionally Appeals For His Own Adoption
 • Old Man Fears To Die Lonely Emotionally Appeals For His Own Adoption
 • Old Man Fears To Die Lonely Emotionally Appeals For His Own Adoption

Trending