आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मृत्यूचा महासागर\' म्हणून कुप्रसिद्ध होते हे धसणारे वाळवंट, असे बदलले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिनजियांग - जगातील दुसरे सर्वात मोठे वाळवंट असलेल्या चीनच्या धसत्या वाळवंट भागात तेल कंपन्यांच्या कामगारांनी जीव ओतला आहे. स्मशान शांतता असलेल्या या वाळवंटाला मृत्यूचा महासागर म्हणूनही ओळखले जाते. आता तेल कंपन्यांनी या वाळवंटात 15 वर्षांत 436 किमी हायवे बनवला आहे. ठिक-ठिकाणी झाडे लावून परिसर हिरवळ केला आहे. हायवे प्रोजेक्टची सुरुवात 2002 मध्ये झाली होती.

 

> तकलामाकन वाळवंट चीनच्या उत्तर-पश्चिमेतील शिनजियांग प्रांतात आहे. 3 लाख 37 हजार चौरस फुटांपर्यंत पसरलेल्या या वाळवंटाचा 85 टक्के भाग स्थानांतर करतो. 
> भल्या-भल्या माणसांना आणि मशीनींना गिळंकृत करणाऱ्या या वाळवंटाला लोक 'सी ऑफ डेथ' याच नावाने ओळखतात. या वाळवंटात जाणारा कधी परत येत नाही अशी भिती लोकांच्या मनात होती. 
> महामार्ग विकसित झाल्याने तकलामाकन आता उर्वरीत भागांशी जोडला गेला आहे. प्राचीन काळात याच वाळवंटातून सिल्क रोड जात होता. अकसू आणि कोरला शहरांचाही विकास झाला. हायवेच्या बाजूला अनेक प्रकारचे वृक्ष लावल्याने येथे पर्यटन देखील वाढले आहे. 
> 1990 मध्ये येथे तॅरिम ऑइल फील्ड शाखेची सुरुवात झाली. यापूर्वी तकलामाकनवर लोक फटकत देखील नव्हते.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आता असे दिसते हे वाळवंट, लोकवस्ती...

बातम्या आणखी आहेत...