Home | International | China | Pensioner Was About To Throw This Rare Pot Got 87k British Pounds At The Auctions

फुटलेली फुलदानी फेकणारच होत्या आजीबाई, लिलावात मिळाले 80 लाख

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 14, 2018, 04:15 PM IST

पॉट जुने असल्याने लिलावात कुणाला तरी 100 पाउंडमध्ये विकण्यात आपण यशस्वी होऊ अशी शक्कल त्यांनी लढवली.

 • Pensioner Was About To Throw This Rare Pot Got 87k British Pounds At The Auctions

  लंडन - ब्रिटनच्या 83 वर्षीय अॅन बेक यांच्या गॅरेजमध्ये भंगारात गेल्या 11 वर्षांपासून एक फुलदानी पडलेली होती. त्यांना आपल्या आजोबांकडून ही फुलदानी वारसाने मिळाली होती. पण, काही ठिकाणांवरून फुटलेल्या आणि अतिशय वाइट अवस्थेत असलेल्या या पॉटवर त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. एकावेळी तर त्यांनी सफाई करताना ती फुलदानी फेकून देण्याचा निर्णय घेतला. पण, पॉट जुने असल्याने लिलावात कुणाला तरी 100 पाउंडमध्ये विकण्यात आपण यशस्वी होऊ अशी शक्कल त्यांनी लढवली. पण, त्या लिलावात या फुलदानीची 100-200 नव्हे, तर तब्बल 87,000 पाउंड अर्थात जवळपास 80 लाख रुपयांत विक्री झाली आहे.


  का आहे खास..?
  - अॅन बेक यांना ही फुलदानी आपल्या आजोबांकडून मिळाली होती. त्यांचे आजोबा जुन्या आणि अॅन्टीक वस्तूंना रीस्टोर करण्याचे काम करत होते. त्यांनीच आपल्या नातीला ही फुलदानी गिफ्ट केली होती. कित्येक वर्षे घरात ठेवल्यानंतर पॉटची झीज झाली. 11 वर्षांपूर्वीच त्यांनी ही फुलदानी गॅरेजमध्ये भंगारासोबत ठेवून दिली.
  - ज्या पॉटला त्या भंगार समजत होत्या. ती प्रत्यक्षात 18 शतकामध्ये चीनच्या शाही (किंगलोंग) घराण्याकडे होती. खास शाही घराण्यासाठी तयार करण्यात आलेले हे पॉट शाही घराण्यातील पिढ्यांसाठी प्रतिष्ठेचे लक्षण होते.
  - पॉटवर काढण्यात आलेल्या कलाकृतीमध्ये चीनच्या वारसाची निशाणी आहे. तसेच वादळात असलेल्या देवाचे चित्र आहे. हा देव आपल्या वाढदिवसाचे गिफ्ट स्वीकारताना दाखवण्यात आले आहे.


  ...तर मिळाले असते 4.5 अब्ज रुपये
  जर्मनीत वसलेल्या एका निनावी चिनी नागरिकाने ही कलाकृती 70 हजार पाउंड आणि 17 हजार पाउंड फी अशा एकूण 87,000 पाउंडमध्ये विकत घेतली आहे. फुलदानीच्या तोंडाजवळ आणि इतर ठिकाणी ती तुटलेली आहे. अॅन यांनी ही फुलदानी चांगल्या अवस्थेत आणि शाबूत ठेवली असती तर त्यांना लिलावात तब्बल 50 कोटी ब्रिटिश पाउंड अर्थात जवळपास 4.5 अब्ज भारतीय रुपये मिळाले असते असे तज्ञांनी सांगितले आहे.


  पुढील स्लाइड्सवर आणखी काही फोटो...

 • Pensioner Was About To Throw This Rare Pot Got 87k British Pounds At The Auctions
 • Pensioner Was About To Throw This Rare Pot Got 87k British Pounds At The Auctions
 • Pensioner Was About To Throw This Rare Pot Got 87k British Pounds At The Auctions
 • Pensioner Was About To Throw This Rare Pot Got 87k British Pounds At The Auctions

Trending