आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्यापेक्षा 170 पट महागडा विकला जातोय हा धातू, झटक्यात कोट्यधीश झाले गावकरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - चीनच्या युन्नान प्रांतातील एका गावात लोक एका रात्रीत कोट्यधीश बनले आहेत. या गावकऱ्यांना शेकडो असे धातूचे तुकडे सापडले ज्यांची किंमत सोन्यापेक्षा 170 पट महाग आहे. हे धातू सुरुवातीला 3 हजार रुपये प्रति ग्रॅमला विकण्यास सुरुवात झाली. आसपासच्या लोकांना या धातूचे महत्व कळाले तेव्हा गावकऱ्यांकडून ते विकत घेण्यासाठी लोकांची गर्दी वाढली. काही तासांतच या विचित्र धातूची प्रति ग्रॅम किंमत लाखोंमध्ये गेली. लोक या धातूच्या एका ग्रॅमसाठी तब्बल 5.25 लाख रुपये मोजत आहेत. प्रत्येक धातूचा तुकडा सरासरी 100 ग्रॅम आहे. अर्थात एकानेही त्याची विक्री केली तर तो 5 कोटी कमवणार हे निश्चित झाले. 


आकाशातून पडले या धातूचे तुकडे...
युनान प्रांतातील जिंगबोंग गावात पडलेले हे धातूचे तुकडे प्रत्यक्षात उल्कापिंडचे अवशेष आहेत. गेल्या आठवड्यातच जिंगबोंग गावाच्या आकाशात अचानक लोकांना लख्ख प्रकाश दिसून आला. सुदैवाने वातावरणात प्रवेश करताना त्या उल्कापिंडाची झीज झाली आणि छोटेशे तुकडे खाली पडले. शांघाईस्टच्या वृत्तानुसार, रात्री पावणे 10 च्या सुमारास पडलेल्या या तुकड्यांपैकी काही तुकडेच गावकऱ्यांच्या हाती लागले आहेत.


यामुळे आले महत्व...
आकाशातून पडलेले हे धातू नेमक्या कोणत्या स्वरुपाचे आहेत यावर संशोधन होऊ शकले नाही. कारण, उल्कापात होताच गावकऱ्यांनी सगळे तुकडे जमा करून घरी नेले. दुसऱ्या दिवशी संशोधक आले तेव्हा गावकऱ्यांनी आणखी गर्दी केली आणि स्थानिकांना 200 हून अधिक तुकडे सापडले. त्यामुळे, चीन सरकारला यावर संशोधन सुद्धा करता आले नाही. मुळात संशोधनासाठी सरकारकडे ते धातूच नाही. अशात गावकऱ्यांच्या हाती लागलेल्या धातूंना प्रचंड मागणी आली. पहिल्या दिवशी 3 हजार प्रति ग्रॅम विकल्या गेलेल्या धातूंची किंमत दुसऱ्या दिवशी तब्बल 5 लाख 25 हजार रुपयांवर गेली. त्या खड्यांचा काळा बाजार सुरू झाला. सरकारने नागरिकांना आवाहन केले आहे, की ते सर्व तुकडे प्रशासनाकडे जमा करावे. परंतु, लोकांच्या हट्टापायी आता सरकावर सुद्धा ते विकत घेण्याची वेळ आली आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...