Home | International | China | Smuggle Treasury Of Mammoth Ivory

येथे गाडले गेलेत प्राचीन हस्तीदंत, शोधून लाखोंची कमाई करताहेत लोक!

दिव्यमराठी वेब टीम | Update - Feb 16, 2018, 10:41 AM IST

रशियाच्या सायबेरिया प्रांतात गेल्या अनेक दिवसांपासून लोक प्राचीन मॅमथचे अवशेष शोधून काढत आहेत.

 • Smuggle Treasury Of Mammoth Ivory

  इंटरनॅशनल डेस्क - रशियाच्या सायबेरिया प्रांतात गेल्या अनेक दिवसांपासून लोक प्राचीन मॅमथचे अवशेष शोधून काढत आहेत. हजारो वर्षे जुने असलेले हे अवशेष शोधून आणि त्यांची तस्करी करून स्थानिक लाखो रुपयांची कमाई करत आहेत. यात सर्वात महाग या प्राचीन महाकाय हत्तींचे (मॅमथ) दात आहेत. काळ्या बाजारात या हस्तीदंतांना 30 ते 40 हजार डॉलर (जवळपास 22 लाख रुपये) मिळत आहेत. फोटोग्राफर एमॉस चॅपल यांना ही गोष्ट सायबेरियातील स्थानिकांकडून कळाली आहे. चॅपल यांनी त्याचेच काही फोटोज टिपले आहेत. हिमयुगात होते मॅमथ...

  - चॅपल यांनी सांगितल्याप्रमाणे, हिमयुगात महाकाय हत्ती मॅमथचे अस्तित्व होते. त्यावेळी सर्वाधिक मॅमथ सायबेरियात वास्तव्य करत होते. त्यामुळेच, त्यांचे सर्वाधिक सांगाडे आणि हस्तीदंत याच परिसरात सापडत आहेत.
  - सायबेरिया जगातील सर्वात बर्फाळ आणि थंड रहिवासी परिसर आहे. वर्षांचे 12 महिने बर्फ असल्याने या भागातील प्राचीन प्राण्यांचे अवशेष आजही सुरक्षित आहेत.
  - एका स्थानिका दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक हस्तीदंत शोधण्यासाठी समस्त जंगल आणि गुफा खांगाळतात. त्याच ठिकाणी मॅमथ आणि इतर प्राचीन प्राण्यांचे अवशेष सापडतात.
  - सायबेरियातून आतापर्यंत शेकडो हस्तीदंत शोधून काढण्यात आले आहेत. ज्यांची काळ्या बाजारात प्रचंड मागणी आहे.
  - तस्कर बाहेरचे असल्याने त्यांना या परिसरात राहण्याची सवय नाही. मात्र, येथे राहून हाडे गोठवणाऱ्या थंडीची स्थानिकांना सवय पडली आहे. त्यामुळेच, तस्कर हस्तीदंत आणि इतर अवशेष शोधण्यासाठी स्थानिकांची मदत घेतात.

  पुढील स्लाईड्सवर पाहा, प्राचीन हस्तीदंत आणि अवशेष काढतानाचे आणखी काही फोटोज...

 • Smuggle Treasury Of Mammoth Ivory
 • Smuggle Treasury Of Mammoth Ivory
 • Smuggle Treasury Of Mammoth Ivory
 • Smuggle Treasury Of Mammoth Ivory
 • Smuggle Treasury Of Mammoth Ivory
 • Smuggle Treasury Of Mammoth Ivory
 • Smuggle Treasury Of Mammoth Ivory
 • Smuggle Treasury Of Mammoth Ivory
 • Smuggle Treasury Of Mammoth Ivory
 • Smuggle Treasury Of Mammoth Ivory
 • Smuggle Treasury Of Mammoth Ivory
 • Smuggle Treasury Of Mammoth Ivory
 • Smuggle Treasury Of Mammoth Ivory

Trending