आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: हॉस्टेलमध्ये घुसला साप; विद्यार्थ्यांनी शिजवून खाल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - घरात किंवा हॉस्टेलमध्ये साप दिसल्यास काय कराल? साहजिकच कुणीही घाबरून जाईल. काहींचा ओरडून-ओरडून घसा कोरडा पडेल. तर काहींचा आवाजच निघणार नाही. पण, एका विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांवर ही वेळ आली, तेव्हा ते मुळीच घाबरले नाहीत. त्यांनी त्या सापाला पकडून शिजून खाल्ले. एवढेच नव्हे,       तर लंचमध्ये त्याचा मेन कोर्स करून आजूबाजूच्या खोल्यांमध्ये राहणाऱ्या आपल्या मित्रांना सुद्धा पार्टीला बोलावले.


Engineering चे विद्यार्थी होते...
> हा प्रकार भारतात नव्हे, तर चीनमध्ये घडला आहे. चोंगकिंग अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये हा प्रकार घडला आहे. विद्यार्थी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे होते. त्यापैकी एकाला आपल्या रुमबाहेर चक्क साप दिसून आला. त्याने इतरांना बोलावले, तेही घाबरून नव्हे, तर अगदी खुश होऊन...
> शांघाईस्टच्या वृत्तानुसार, त्यांनी वेळीच तो साप पकडला आणि अगदी प्रोफेशनल शेफप्रमाणे कामाला लागले. सुरुवातीला त्यांनी या सापाचे शिर कापले. यानंतर स्किन काढून आणि पोटातील अनावश्यक भाग काढून त्याचे छोटे-छोटे तुकडे कापले. तसेच लाल खजूर, संत्र्याचे सालटे आणि इतर फ्रेश भाजीपाला टाकून त्याची ग्रेव्ही तयार केली. 


महाविद्यालय प्रशासनाला कळाले तेव्हा...
> विद्यार्थ्यांनी या सापाचा सूप आणि ग्रेव्ही तयार करून मित्रांनाही बोलावून ताव मारला. तसेच या संपूर्ण घटनेचे आणि स्वयंपाकाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. सोशल मीडियावर फोटो पाहिल्यानंतरच एका प्राध्यापकाला हा प्रकार समजला.
> महाविद्यालय प्रशासनाला विद्यार्थ्यांचा हा प्रकार मुळीच आवडला नाही. अशा घटनांमुळे महाविद्यालयाची प्रतिमा मलीन होईल आणि इतर गोष्टींवर प्राचार्यांनी त्यांना मोठे लेक्चर दिले. तसेच इशारा देऊन सोडण्यात आले. 


अनेक देशांमध्ये साप एक व्यंजन
चीन, तैवान, थायलंड, इंडोनेशिया, कंबोडिया आणि व्हिएतनामसह अनेक आशियाई देशांमध्ये साप एक व्यंजन म्हणून प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी सापाच्या सूपला स्ने स्ट्यू असे म्हणतात. त्या ठिकाणी अनेक शहरांमध्ये तो एक स्ट्रीट फूड म्हणूनही दिला जातो. थंडीत साप अधिक खाल्ले जातात. शरीर गरम ठेवण्यासाठी सापांचे सूप आरोग्यासाठी चांगले असतात असे आशियात मानले जाते. अनेक शेफ बिनविषारी सापांचे व्यंजन तयार करतात. तर काही एक्सपर्ट शेफ विषारी सापांचे डिश तयार करतात. पण, त्यासाठी अनेक वर्षांचा अनुभव लागतो. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, विद्यार्थ्यांनी स्नेक सूप तयार करताना शेअर केलेले फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...