Home | International | China | If the country intervenes in Maldives, the situation will worsen; Statement of China Ministry of Foreign Affairs

भारताने मालदीवमध्ये हस्तक्षेप केल्यास स्थिती बिघडेल ; चीन परराष्ट्र मंत्रालयाचे वक्तव्य

वृत्तसंस्था | Update - Feb 08, 2018, 12:58 AM IST

चीनने मालदीवमध्ये भारतीय लष्कराच्या कुठल्याही संभाव्य कारवाईला विरोध केला आहे. मालदीवचे माजी अध्यक्ष मोहंमद नशीद यांनी

 • If the country intervenes in Maldives, the situation will worsen; Statement of China Ministry of Foreign Affairs

  माले/कोलंबो/बीजिंग- चीनने मालदीवमध्ये भारतीय लष्कराच्या कुठल्याही संभाव्य कारवाईला विरोध केला आहे. मालदीवचे माजी अध्यक्ष मोहंमद नशीद यांनी भारताकडे लष्करी हस्तक्षेपाची मागणी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बुधवारी चीनने म्हटले आहे की, त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडेल. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता गेंग शुआंग म्हणाले की, आंतरराष्ट्रीय समुदायाने मालदीवच्या सार्वभौमत्वाचा सन्मान करून रचनात्मक भूमिका बजवावी. तेथील परिस्थिती आणखी खराब होऊ नये, असे पाऊल कोणत्याही देशाने उचलू नये. मालदीवचे सर्व पक्ष सध्याचे अंतर्गत संकट सोडवतील.


  मालदीवच्या संकटावरील उपायासाठी भारताने आपल्या लष्कराला सतर्क केले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी करत मालदीवमधील आणीबाणी दुर्दैवी असून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अटकेचे आदेश चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. कायद्याचे राज्य स्थापित करा, असे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुतेरेस यांनी मालदीवच्या अध्यक्षांना सांगितले आहे. यामीन यांनी देशात सर्व सुरळीत आहे, असे म्हटले आहे.

  > संकट : सत्तेतून हटवण्याचा कट रचला गेला : यामीन

  मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी आणबाणीबाबत म्हटले आहे की, मला सत्तेतून हटवण्याचा कट केला जात होता. त्यात सुप्रीम कोर्टाचे अटक केलेले न्यायमूर्तीही होते. न्यायमूर्तींच्या विरोधात चौकशीचा दुसरा पर्याय नसल्याने आणीबाणी लावावी लागली. माजी अध्यक्ष नशीद यांनी ट्विट करून म्हटले की, न्यायमूर्ती अली हमीद यांच्याशी तुुरुंगात गैरवर्तणूक झाल्याचे समजते.

  > सल्ला : भारताला शेजाऱ्यांवर नियंत्रणाची इच्छा : चीन

  चीनच्या ग्लोबल टाइम्स या सरकारी वृत्तपत्राने म्हटले आहे की, राजकीय संकट कोणत्याही देशाचा अंतर्गत प्रश्न आहे. भारताने त्यात हस्तक्षेप करू नये. मालदीव भारताच्या दबावाखाली आहे. भारताला दक्षिण आशियाई देशांवर नियंत्रण हवे आहे. त्या देशांत आता सार्वभौमत्वाची भावना वाढत आहे. सर्व देशांना आता भारताची ही भूमिका नकोशी झाली आहे.

  > सहकार्य : भारताची १९६५ मध्ये मालदीवला मान्यता

  भारताचे मालदीवशी जुने संबंध आहेत. १९६५ मध्ये मालदीवला सर्वात आधी मान्यता देणाऱ्या देशांत भारताचा समावेश होता. भारताने १९७२ मध्ये तेथे आपले दूतावास उघडले होते. तेथे सुमारे २५ हजार भारतीय राहत आहेत. मालदीवला जाणाऱ्या विदेशी पर्यटकांत ६% भारतीय असतात. १९८८ मध्ये मालदीवमध्ये सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न भारताने हाणून पाडला होता.

  पुढील स्‍लाइडवर पाहा, सागरी सुरक्षेत मालदीव महत्त्वपूर्ण...

 • If the country intervenes in Maldives, the situation will worsen; Statement of China Ministry of Foreign Affairs
 • If the country intervenes in Maldives, the situation will worsen; Statement of China Ministry of Foreign Affairs
 • If the country intervenes in Maldives, the situation will worsen; Statement of China Ministry of Foreign Affairs
 • If the country intervenes in Maldives, the situation will worsen; Statement of China Ministry of Foreign Affairs

Trending