आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनचा चौथा सर्वात धनाढ्य माणूस, मुलाने ठोकरली अब्जावधींची संपत्ती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - चीनचे चौथे सर्वात धनाढ्य व्यक्ती असलेले वांग जिआनलिन फोर्ब्सच्या टॉप 30 यादीत समाविष्ट आहेत. वांग डालियन वांडा ग्रुप कॉर्पोरेशन लिमिटेडचे संस्थापक आहेत. 2015 मध्ये ते आशिया खंडातील सर्वात श्रीमंत उद्योजक ठरले होते. त्यांनी चीनचे अलीबाबा फाउंडर जॅक मा आणि ली का शिंग यांनाही पिछाडीवर टाकले होते. पण, त्यांना ही संपत्ती आणि बिझनेस सांभाळण्यासाठी वारसदार सापडत नव्हता. त्यांच्या मुलाने अब्जावधींची संपत्ती नकारली होती. 

 

- वांग 1970 ते 1986 पर्यंत चिनी लष्करात होते. यानंतर एक छोटे प्रॉपर्टी डेव्हलपर म्हणून त्यांनी 1988 मध्ये सुरुवात पोर्ट सिटी डॅलियन येथून केली. 
- आज चीनच्या 60 शहरांमध्ये कंपनीची संपत्ती 90 लाख चौरस मीटर संपत्ती आहे. त्यामध्ये 58 शॉपिंग प्लाझा, 25 लग्जरी हॉटेल, 68 सिनेमागृह आणि 57 डिपार्टमेंटल स्टोर्स आहेत. 
- एएमसी थिएटर्स खरेदी केल्यानंतर 10 हजार स्क्रीनसह जगातील सर्वात मोठ्या सिनेमागृहांची चेन बनवली. वेस्टिन आणि सॉफिटेल मार्फत ऑपरेट होणाऱ्या हॉटेल आणि शॉपिंग मॉल्स सुद्धा त्यांच्याच आहेत.
- यूरोपियन फुटबॉल क्लबमध्ये भागिदारी घेतल्यानंतर त्यांनी डिक क्लार्क प्रॉडक्शन विकत घेतले. यासोबत गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा प्रसारणाचे अधिकार मिळवले. 

 

मुलाने ठोकरली संपत्ती
- वांग यांनी सांगितल्याप्रमाणे, ''माझ्या मुलाला (सिकोंग) जबाबदारी स्वीकारण्याबद्दल विचारणा केली तेव्हा त्याने स्पष्ट नकार दिला. मी तुमच्यासारखे जीवन जगण्यास इच्छुक नाही. असे तो म्हणाला.'' 
- ''आज युवकांच्या प्राथमिकता वेगळ्या आहेत. त्यामुळे मॅनेजिंग समुहाला जबाबदारी सोपवून आम्ही बोर्डमध्ये राहून काम सांभाळावे हाच पर्याय उत्तम आहे.''

 

मुलाने कुत्र्यासाठी विकत घेतले 8 iPhone
- जिआनलिन यांचा मुलगा सिकोंग आता 30 वर्षांचा झाला आहे. तो गतवर्षी आपल्या कुत्र्यासाठी 8 iPhone 7 विकत घेऊन जगभरात सोशल मीडियावर चर्चेत आला होता. 
- तर 2015 मध्ये त्याने आपल्या कुत्र्यासाठीच 2 अॅपल वॉच खरेदी केल्या होत्या. सिकोंग वांडा ग्रुपचा 2 टक्क्यांचा पार्टनर आहे. अर्थातच तो 12,400 कोटी रुपयांचा मालक आहे. 
- त्याने लंडन येथून आपले पदवीचे शिक्षण घेतले आहे. तसेच 2011 मध्ये वडिलांकडून 488 कोटी रुपये घेऊन इक्विटी फंड कंपनी सुरू केली होती. 
- सोबतच इंटरनेट एंटरटेनमेंट, गेमिंग आणि सोशल नेटवर्किंग इंडस्ट्री, डायनिंग कंपनीमध्ये त्याने गुंतवणूक केली आहे. 
- सोशल मीडियावर त्याचे 2 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याला चीनचा मोस्ट एलिजिबल बॅचलर देखील म्हटले जाते. कित्येक चिनी अभिनेत्रींसोबत त्याचे रिलेशन चर्चेत राहतात. 

बातम्या आणखी आहेत...