आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात धनाढ्य गाव, मोठ-मोठे बंगले अन् प्रत्येकाची वार्षिक कमाई 80 लाख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाक्शी - हे छायाचित्र आहे चीनमधील जियांगसू प्रॉविन्समधील वाक्शी गावाचे. याला चीनचे ‘सुपर विलेज’ आणि जगातील सर्वात श्रीमंत गाव म्हटले जाते. येथील सर्वाजवळ आपले घर, कार आणि भरपूस पैसा आहे. शांघायपासून 135 किमी दूरवर असलेल्या या गावात आज शेकडो कंपन्या आहेत तसेच मोठ्या प्रमाणात शेतीही केली जाते.

 

एका व्यक्तीच्या प्रयत्नामुळे गाव बनले श्रीमंत...
वर्षे 2014 मध्ये येथील प्रत्येक व्यक्तीचे वार्षिक सरासरी उत्पन्न 88 लाख रुपये एवढे होते. असेही नाही की हे गाव पहिल्यापासून श्रीमंत होते. 1961 मध्ये हे गाव खूपच गरीब होते. एकी व्यक्तीने केलेल्या प्रयनामुले या गावात समृद्धी येऊ लागली. ते होते कम्युनिस्ट पार्टीचे लोकल सेक्रेटरी वू रेनबाओ, ज्यांनी या समृद्धी प्लॅन बनवला व इंडस्ट्री आणली. त्यांनी कंपनीची स्थापना करून सामूहिक शेतीला प्रोत्साहन दिले.

 

गावातील प्रत्येक व्यक्ती शेयर होल्डर
- 1990 च्या दशकात कंपनी लिस्टेड झाली आणि गावातील प्रत्येक व्यक्ती शेयर होल्डर बनला.
- सध्या येथे 70 पेक्षा अधिक कंपन्या आहेत तसेच येथील प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात सरासरी 67 लाख रुपये जमा आहेत.
- लोहा, सिल्क, चिप मेकिंग आणि पर्यटनातून 2012 मध्ये 64 हजार कोटी रुपयाचा इन्कम झाला. 
- गावातील बहुतेक घरे एकसारखीच आहेत. तसेच सर्व घरात 10-10 खोल्या आहेत. त्या जर तुम्ही पाहिल्या तर तुम्हाला हॉटेलपेक्षा कमी वाटणार नाहीत.
- गावातील लोकांचे 80 टक्के उत्पन्न कराच्या रूपात जाते मात्र त्याबदल्यात अनेक मोफत सुविधा मिळतात.
- यात लग्झरी विला, कार, हेल्थ केयर, फिरण्यासाठी हेलिकॉप्टर, लग्झरी हॉटेलात डिनर यासारख्या सुविधा मिळतात. 
- गावात 20 हजारांहून जास्त मजूर काम करतात जे आसपासच्या गावातील लोक असतात.
- 2013 मध्ये जग सोडून गेलेले रेनबाओ म्हणायचे, हाच खरा समाजवाद आहे जेथे 100 पैकी 98 लोक खूष राहतात.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, गावातील नजारा आणि आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...