OMG! धार-दार ब्लेड / OMG! धार-दार ब्लेड असे लोकांचे डोळे साफ करतो हा अवलिया...

OMG! धार-दार ब्लेड असे लोकांचे डोळे साफ करतो हा अवलिया....

दिव्य मराठी वेब टीम

Feb 22,2018 10:47:00 AM IST

चेंगडू - डोळे स्वच्छ करण्याच्या अनेक पद्धती पाहिल्या असतील. मात्र, ही चिनी पद्धत खरोखर डोळे उघडणारी आहे. एकच चूक, आणि डोळा गेल्याशिवाय राहणार नाही. चीनच्या शियांग नामक व्यक्ती धारदार रेझर ब्लेडने डोळे साफ करण्यासाठी प्रसिद्ध आहे. डोळे स्वच्छ करण्याची ही प्राचीन कला असल्याचे तो म्हणतो. शियांग ही घातक कलाकारी गेल्या 40 वर्षांपासून करत आहे.

40 वर्षांचा अनुभव
- 62 वर्षीय शियांग चेंगडू शहकात गेल्या 40 वर्षांपासून छोट्याशा दुकानावरून आपली कलाकारी दाखवतोय. याच ठिकाणी तो लोकांचे डोळे पैसे घेऊन साफ करतो.
- डोळ्याच्या स्वच्छतेसाठी चालणारे हे क्लिनिंग सध्या चर्चेत आहे. चक्क धारदार ब्लेडने तो डोळ्यातील मळ काढतो.
- विशेष म्हणजे, एवढा घातक प्रकार असतानाही आपल्या 40 वर्षांच्या अनुभवात एकाच्या डोळ्याचे नुकसान केले नाही असा दावा शियांग करतो.
- शियांगने सांगितल्याप्रमाणे, अशा पद्धतीने डोळे साफ करणाऱ्यांना नेहमीच फायदा होतो. त्यांना पूर्वीपेक्षा चांगले दिसायला लागते. आपल्या या कलेची त्याला अद्याप एकही तक्रार मिळालेली नाही.


पुढील स्लाइड्सवर पाहा, त्याच्या अजब क्लिनिकचे गजब ग्राहक...

X
COMMENT