Home | International | China | Traditional Chinese Medicine And Food Widely Known As Hasma In China Made From Frogs

चीनमध्ये बेडकांचा असाही वापर, दुकानांबाहेर दिसतील असे दृश्य...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 28, 2018, 04:10 PM IST

चीनमध्ये पारंपारिक औषधी आणि खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी जंगली बेडकांची निर्दयीपणे शिकार केली जाते.

 • Traditional Chinese Medicine And Food Widely Known As Hasma In China Made From Frogs

  बीजिंग - चीनमध्ये पारंपारिक औषधी आणि खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी जंगली बेडकांची निर्दयीपणे शिकार केली जाते. यात जिवंत बेडूकच्या शरीरात तार खुपसून टांगले जाते. ही छायाचित्रे त्याच बेडकांच्या समूहाची आहेत. चीनच्या जिलीन प्रांतातील किराणा दुकानांवर हे चित्र सामान्य आहे. यात बेडूक मरेपर्यंत टांगल्या जातो. यानंतर त्यातून निघणाऱ्या कोलेजन (शरीरातून निघणारे हाय प्रोटीनयुक्त चिवट पदार्थ) घेऊन त्यापासून 'हस्मा' हे खास खाद्यपदार्थ बनवले जाते. याच पदार्थापासून चीनमध्ये अॅन्टी एजिंग क्रीम, सौंदर्य प्रसाधने, डेझर्ट आणि हाय प्रोटीन खाद्यपदार्थ देखील तयार केले जातात.

  - हे फोटोज जिलीन प्रांतातील डोंगराळ भागात टिपले आहेत. या दुकानावर बेडकांना सळ्यांमध्ये टांगून ठेवण्यात आले आहे. मरेपर्यंत त्यांना अशाच अवस्थेत ठेवल्या जाते.
  - दुकानदार हिरव्यागार वनांतून यांना पकडून आणतात. मृत्यूनंतर या बेडकांच्या शरीरातून मज्जा निघतो. शरीराच्या नलिकांतून त्याच पदार्थाला बाजूला काढून बेडकांना फेकून दिल्या जाते.
  - आयफेंग डॉटकॉमच्या माहितीनुसार, लटकूनच त्यांच्या शरीरातून हस्मा काढल्या जाऊ शकतो. हाँगकाँग विद्यापीठाने देखील या सत्वाचे गुण सांगितले आहेत.
  - प्राध्यापक चेन जियानपिंग यांनी सांगितल्याप्रमाणे, हस्मा खास मादा बेडकांच्या आतड्या आणि नळ्यांतून काढलेल्या सत्वापासून तयार केले जाते. हायप्रोटीनयुक्त या ट्यूबमध्ये न्युट्रियंट्स आणि ऑयस्ट्रोजेन असते. जे अॅन्टी एजिंग क्रीममध्ये वापरतात.

  पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो़ज...

Trending