50 व्या वर्षी दिसते इतकी Young, लोकांना वाटते या मुलाची गर्लफ्रेंड
चीनची एक महिला आपल्या यंग आणि ग्लॅमरस लुकमुळे सोशल मीडियावर स्टार बनली आहे.
-
इंटरनॅशनल डेस्क - चीनची एक महिला आपल्या यंग आणि ग्लॅमरस लुकमुळे सोशल मीडियावर स्टार बनली आहे. पहिल्या नजरेत ती वीशीतली तरुणी वाटत असली तरीही तिने वयाची पन्नाशी गाठली आहे. लियू येलिन इतकी तरुण दिसते की तिचा मुलगा आणि मुलगी सुद्धा एकसारख्याच वयाचे वाटतात. कित्येक वेळा तिने आपल्या मुलासोबत फोटो सोशल मीडियावर शेअर केला. पण, त्या मुलाला ती तुझी गर्लफ्रेंड आहे का अशी विचारणा झाली आहे. इंस्टाग्रामवर स्टार बनलेली येलिन जगभरात चर्चेत आहे.
- लियू हिचे क्वीनयेलिन या नावाने सोशल मीडिया अकाउंट आहे. त्यावर ती आपल्या फॉलोअर्ससोबत देखील फोटो शेअर करते.
- नुकतेच तिने बर्फात ब्लॅक गॉगल आणि बिकीनीसोबत काही फोटो शेअर केले. तिचे हे फोटोज जगभरात व्हायरल झाले आहेत. हे फोटोज पाहून ती 50 वर्षांची असेल याचा कुणाला विश्वासही बसत नाही.
- लियु गेल्या वर्षी चर्चेत आली होती, जेव्हा तिने आपल्या मुलासोबत एक फोटो शेअर केला होता. पण, लोकांनी तिला त्या मुलाची गर्लफ्रेंड मानले होते.
- लियूचा मुलगा यिशुआनने सुद्धा यासंदर्भात सोशल मीडियावर आपला एक अनुभव शेअर केला होता.अशी ठेवते स्वतःला फिट
लियूने सांगितल्याप्रमाणे, ती वयाच्या 80 व्या वर्षी सुद्धा अशाच प्रकारे बिकिनी शूट्स करू इच्छिते. आपल्या या कार्यामुळे लोकांना फिट राहण्याची प्रेरणा मिळत असावी अशी तिला अपेक्षा आहे. तिने आपल्या ग्लॅमरस आणि यंग लुकचे श्रेय व्यायामाला दिले आहे. गेल्या 30 वर्षांपासून ती वेट ट्रेनिंग आणि दैनंदिन व्यायाम करते. त्यातही खासकरून बर्फात व्यायाम आणि योगा केल्या शरीर तरुण राहते असे तिचे म्हणणे आहे. तसेच कित्येक वर्षांपासून आपण बर्फाच्या पाण्यात किंवा हिमनद्यांमध्ये स्वीमिंग करतो अशा दावा तिने केला आहे.पुढील स्लाइड्सवर पाहा, या ग्लॅमरस बिकिनी मॉडेलचे आणखी काही फोटो...
-
-
-
-
-
-
-