आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्लफ्रेंडचा Birthday Wish करण्यासाठी त्याने पाठवला 35 लाखांच्या नोटांचा बुके

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चीनच्या चोंगकिंग शहरात एका युवकाने आपल्या प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दिलेला बुके सध्या व्हायरल होत आहे. या बुकेचे वैशिष्ट्य म्हणजे, तो फुलांपासून नाही तर चीनच्या चलनापासून बनला आहे. या बुकेमध्ये एक-दोन नव्हे, तर तब्बल 35 लाख रुपयांच्या नोटा लावण्यात आल्या आहेत. चेंगकिंग शहरातील   एका पंचतारांकित हॉटेलमध्ये 16 मे रोजी हा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याचेच फोटो आता व्हायरल होत आहेत. 

 

कायदा मोडल्याचे आरोप
- चीनमध्ये सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या फोटोंपैकी एकामध्ये तरुणी आपल्या हातात नोटांचा बुके घेऊन स्माइल करताना दिसून येते. अनेकांनी या फोटोवर टीका सुरू केली. काहींनी यास कायद्याचे उल्लंघन म्हटले आहे.
- चीनमध्ये चलनाचा व्यवहार व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही खास करून शोभेची वस्तू म्हणून वापरणे बेकायदेशीर आहे. व्हायरल फोटोंनी चीनच्या केंद्रीय बँकेचे सुद्धा लक्ष वेधले. तसेच आता बँकेचे अधिकारी या युवकाला शोधून त्याच्या विरोधात कारवाई करणार आहेत.
- चीनच्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हा बुके तयार करण्यासाठी कलाकारांना तब्बल 11 तास लागले. व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये तयारीचा फोटो सुद्धा आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...