आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपार कष्ट करून वाळवंटाला या देशाने केले हिरवे-गार, वाचून चकित व्हाल!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनमधील काबुकी वाळवंट आता कमाईचा मार्ग झाला आहे. - Divya Marathi
चीनमधील काबुकी वाळवंट आता कमाईचा मार्ग झाला आहे.

इंटरनॅशनल डेस्क- कधी काळी वाळवंटातील पडिक जमिन आणि गरीबीमुळे आपल्याच देशात बाजूला पडलेल्या चीनमधील ‘कुबुकी डेजर्ट’ मागील काही दिवसापासून जगभरासाठी एक मिसाल बनून पुढे आले आहे. चीनच्या सरकारने अनेक वर्षे केलेल्या मेहनती आणि नियोजनामुळे आज दुर्लक्षित वाळवंट संपूर्ण बदलले आहे. कधी संपूर्ण चीनमध्ये सॅंडस्टार्मचे कारण बनलेले हे काबुकी वाळवंट आज आपल्या ‘टूरिजम’ आणि ‘इंडस्ट्रियल पॉवर’ साठी जगात ओळखले जाऊ लागले आहे. अशी बदलली स्थिती....

 

- मंगोलियाच्या आतील बाजूला असलेले काबुकी डेजर्ट चीनमधील 7 वा सर्वात मोठे वाळवंट आहे. 1988 आधी नॅचरल रिसोर्सेजच्या कमतरतेमुळे येथे राहणा-या सुमारे 7 लाखांहून अधिक लोकांना गरिबीमुळे आयुष्य ढकलण्याशिवाय पर्याय नव्हता.
- वाळवंटात सतत उठणा-या धूळीच्या वादळामुळे 800 किलोमीटर दूर राजधानी बीजिंगपर्यंत सॅंडस्टॉर्म (धूळीचे वादळ)चा सामना करावा लागत होता. 
- मात्र, 1988 मध्ये चीनची एक कंपनी ‘एलिओन रिसोर्सेज’ तेथे येताच तेथील स्थिती बदलण्यास सुरुवात झाली. 
- वाळवंटातील पडिक जमिनला उपयुक्त बनविण्यासाठी कंपनीने सरकार आणि स्थानिक लोकांच्या मदतीने तेथे विशेष झाडे लावण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी हॉटेल आणि टूरिस्ट अट्रॅक्शन सुद्धा बनविले गेले. 
- पर्यावरणाचा -हास होऊ नये यासाठी उचलल्या गेलेल्या उपायांमुळे वाळवंटाची स्थिती सुधारत गेली. हॉटेल आणि टूरिजम बिजनेसमुळे तेथील गरिबी दूर होण्यास मदत होऊ लागली. 
- कुबुकी डेजर्टमध्ये सध्या जगातील सर्वात मोठे ‘सिंगल स्टेज’ सोलर फार्म आहे. या फार्ममध्ये सुमारे 6 लाख 50 हजार सोलर पॅनेल्स फिट केले आहेत जेथून चीनला हजारों मेगावॉट वीज मिळते. 
- वाळवंटात एवढी डेव्हलपमेंट होत असताना स्थानिक लोकांना नोकरी मिळाल्या आहेत. हॉटेल, टूरिजम आणि सोलर इंडस्ट्री आल्यामुळे काबुकीचे लोक आता वेगाने प्रगती करत आहेत. 
- टूरिस्ट्ससाठी लवकरच या वाळवंटात एक वर्ल्ड क्लास रिसॉर्ट बनविले जात आहे. चीनच्या या कामाचे जगभरात कौतूक होत आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, चीनमधील काबुकी वाळवंट कसे झाले आहे हिरवे-गार मैदान...

बातम्या आणखी आहेत...