आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनने किंगदाओ विमानतळावर ४१ हजार कोटी खर्चून स्टीलचे छत बांधले, ३१ फुटबाॅल मैदानांइतका आकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- चीनने प्रथमच एका विमानतळाच्या टर्मिनलवर स्टेनलेस स्टीलचे छत तयार केले आहे. विमानतळ शेनडाँग राज्यातील किंगदाओ शहरात आहे. छत तयार करण्यास ६ बिलियन डॉलर (४१ हजार कोटी रु.)खर्च आला आहे. छताचे क्षेत्रफळ २ लाख २० हजार चौरस मीटर आहे. म्हणजे एवढ्या क्षेत्रफळात फुटबॉलची ३१ मैदाने तयार होतात. 


किंगदाओ चीनमधील समुद्रकिनाऱ्यावर असलेले शहर आहे. ०.५ मिमी जाडीचे हे छत वादळवारे, पाऊस व समुद्रातील लाटा रोखण्यास सक्षम आहे. जिआओदोंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर रूफिंग प्रोजेक्ट मॅनेजर काई वांग यांनी सांगितले, छत तयार करण्यासाठी १६ हजार ३६८ पॅनल वेल्डिंग करून ४० लाखांहून अधिक स्क्रूने जोडले आहे. हे छत ६० मीटर प्रतिसेकंद वेगाने चालणारे वारे सहन करू शकते. स्टीलचे छत अॅल्युमिनियम, मॅग्नेशियम आणि मँगनीजच्या संमिश्र धातूपेक्षा अनेक पट मजबूत आहे. विमानतळ पुढील वर्षापासून खुले होणार आहे. येथे २०२५ पर्यंत ३ कोटी ५० लाख प्रवासी व ५ लाख टन कार्गो येण्याची शक्यता आहे. 

बातम्या आणखी आहेत...