Home | International | China | Chinas Largest Ghost City Is Now Almost Completely Empty

5 वर्षापासून अवाढव्य लोकसंख्या असलेल्या चीनमधील हे शहर पडलेय ओसाड

दिव्यमराठी वेब टीम | Update - Feb 28, 2018, 10:11 AM IST

सुमारे 3 लाख लोक राहू शकतील अशा आर्दोस सिटीचे उद्घाटन 2013 मध्ये झाले होते.

 • Chinas Largest Ghost City Is Now Almost Completely Empty
  चीनमधील ओसाड पडलेले ‘आर्दोस’ शहर...

  इंटरनॅशनल डेस्क- चीन जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचा विकसनशील देश आहे. याच कारणामुळे तेथे सध्या वेगाने शहरीकरण होत आहे. चीन सरकारने सुद्धा काळाची गरज ओळखून मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा तयार करण्यावर भर दिला. चीनसारख्या अवाढव्य देशात मागणी-पुरवठा याचा कधी कधी मेळ लागत नाही. याचा परिणाम असा झाला आहे की, चीनमध्ये आता अनेक शहरे ओसाड पडली आहेत. त्यामुळे त्यांना ‘भूत’ शहर म्हटले जाते. यातीलच एक आहे कांगबाशी डिस्ट्रिक्टमधील आर्दोस सिटी. यामुळे ओसाड पडलेय शहर....

  - शहर वसवल्यानंतरही हे खाली का पडले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण याचे उत्तर शोधण्यासाठी चीनची प्रमुख इंटरनेट कंपनी बायडूने एक अहवाल तयार केली.
  - बायडूचा मुख्य संशोधक हैशान वू यांनी त्याची तीन कारणे शोधून काढली. घरांची संख्या, रियल एस्टेटमध्ये बूम व चढे दर आणि शहरासाठी स्वस्त दरातील ग्रामीण भागातील जमिन खरेदी करून विकसित करायची व ती महागड्या किमतीने विकायची.
  - डेवलपर्सने सर्व सुविधा तर दिल्या आहेत पण तेथील घरांच्या किंमती एवढ्या महाग आहेत की सामान्य लोकांनाा ती खरेदी करणे केवळ अशक्य आहे.
  - काही लोकांनी तेथे घरे खरेदी केली मात्र, उर्वरित शहर ओसाड राहिल्याने त्यांनीही काही काळानंतर तेथून दुस-या शहरात जाणे पसंत केले.
  - फॉरेंसिक एशिया लिमिटेडच्या एका अहवालानंतर, चीनमध्ये सुमारे 64 मिलियन म्हणजेच 6 कोटी 40 लाख घरे खरेदीदार नसल्याने खाली पडली आहेत. येथे दर वर्षी 20 नवे शहरे वसविली जातात मात्र ही घरे महाग असल्याने लोक स्थिरावत नसल्याचे पुढे आले आहे.

  5 वर्षापासून खाली आहे हे शहर....

  - सुमारे 3 लाख लोक राहू शकतील अशा आर्दोस सिटीचे उद्घाटन 2013 मध्ये झाले होते.
  - तेथील विकसक व बिल्डरांना आशा होती की, सर्व सेवा-सुविधा, आधुनिक आणि सुंदर शहर वसविल्यास लोक आकर्षित होतील, मात्र असे काही घडले नाही.
  - सुरुवातीला येथे खूप लोक आले, मात्र, घरांच्या महागड्या किंमती पाहून 80 टक्के घरे विकलीच गेली नाहीत.
  - काही लोक येथे राहायला आले सुद्धा. मात्र, तेथे खूपच कमी लोक राहत असल्याने त्यांनीही तेथून निघून जाणे पसंत केले.
  - घरमालकांनी कमी किंमतीत ही घरे भाड्याने देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे ठेवलेल्या अत्यावश्यक गोष्टीही जसे अन्नधान्य, दुध, भाज्या व इतर गरजेच्या वस्तू, पदार्थाचे दर खूपच महाग ठेवल्याने तो प्रयत्न फसला.

  पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, 'भूत शहर’ म्हणून ओळखले जाणारे ‘आर्दोस’चे फोटोज...

 • Chinas Largest Ghost City Is Now Almost Completely Empty
  सुमारे 3 लाख लोक राहू शकतील अशा आर्दोस सिटीचे उद्घाटन 2013 मध्ये झाले होते.
 • Chinas Largest Ghost City Is Now Almost Completely Empty
  तेथील विकसक व बिल्डरांना आशा होती की, सर्व सेवा-सुविधा, आधुनिक आणि सुंदर शहर वसविल्यास लोक आकर्षित होतील, मात्र असे काही घडले नाही.
 • Chinas Largest Ghost City Is Now Almost Completely Empty
  सुरुवातीला येथे खूप लोक आले, मात्र, घरांच्या महागड्या किंमती पाहून 80 टक्के घरे विकलीच गेली नाहीत.
 • Chinas Largest Ghost City Is Now Almost Completely Empty
  काही लोक येथे राहायला आले सुद्धा होते. मात्र, तेथे खूपच कमी लोक राहत असल्याने त्यांनीही तेथून निघून जाणे पसंत केले.
 • Chinas Largest Ghost City Is Now Almost Completely Empty
  घरमालकांनी कमी किंमतीत ही घरे भाड्याने देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे ठेवलेल्या अत्यावश्यक गोष्टीही जसे अन्नधान्य, दुध, भाज्या व इतर गरजेच्या वस्तू, पदार्थाचे दर खूपच महाग ठेवल्याने तो
 • Chinas Largest Ghost City Is Now Almost Completely Empty
  शहर वसवल्यानंतरही हे खाली का पडले याचे शोध घेण्यासाठी चीनची प्रमुख इंटरनेट कंपनी बायडूने एक अहवाल तयार केला.
 • Chinas Largest Ghost City Is Now Almost Completely Empty
  डेवलपर्सने सर्व सुविधा तर दिल्या आहेत पण तेथील घरांच्या किंमती एवढ्या महाग आहेत की सामान्य लोकांनाा ती खरेदी करणे केवळ अशक्य आहे.
 • Chinas Largest Ghost City Is Now Almost Completely Empty
  काही लोकांनी तेथे घरे खरेदी केली मात्र, उर्वरित शहर ओसाड राहिल्याने त्यांनीही काही काळानंतर तेथून दुस-या शहरात जाणे पसंत केले.
 • Chinas Largest Ghost City Is Now Almost Completely Empty
  फॉरेंसिक एशिया लिमिटेडच्या एका अहवालानंतर, चीनमध्ये सुमारे 64 मिलियन म्हणजेच 6 कोटी 40 लाख घरे खरेदीदार नसल्याने खाली पडली आहेत.
 • Chinas Largest Ghost City Is Now Almost Completely Empty
  चीनमध्ये दर वर्षी 20 नवे शहरे वसविली जातात मात्र ही घरे महाग असल्याने लोक स्थिरावत नसल्याचे पुढे आले आहे.

Trending