आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: ड्रॅगनचा डोकलामला पुन्हा विळखा, भारताच्या \'चिकन्स नेक\'वर वाईट नजर!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिक्किम-भूतान सीमेवरील वसलेले चुंबी खोरे.... - Divya Marathi
सिक्किम-भूतान सीमेवरील वसलेले चुंबी खोरे....

इंटरनॅशनल डेस्क- डोकलाममध्ये भारत-चीन यांच्यातील वादाला नव्याने तोंड फुटले आहे. सॅटेलाईटद्वारे मिळालेल्या फोटोवरून हे स्पष्ट झाले आहे की, चीनने वादग्रस्त सीमा क्षेत्र डोकलाममध्ये घुसून काही नविन हेलीपॅड बनविली आहेत. तसेच त्या परिसरात मोठ्या प्रमाण शस्त्रात्र, टॅंक आणि रस्ते बांधणीचे साहित्य व वाहने दिसत आहेत. गेल्या वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये चीनी सैनिकांनी अशीच घुसखोरी केली होती ज्याला भारताने जोरदार प्रत्त्युत्तर दिले होते. त्या दरम्यान भारत आणि चीनमध्ये 73 दिवस तानाताणी सुरू होती. अखेर ऑगस्टमध्ये चीनने एक पाऊल मागे घेतले. त्यावेळी भारताचा नैतिक विजय मानला गेला. पण सहजासहजी हार मानेल तो कसला. डॅगनने पुन्हा एकदा आपले खरं रूप दाखविले आहे. सिक्किम-भूतान सीमेवरील 'चुंबी खोरे' जवळ ज्या जागेवर चीन रस्ते बांधण्यास पुन्हा सुरूवात केली आहे.

 

खरा वाद तर चीन आणि भूतानमध्ये आहे. मात्र, डोकलामचे सामरिक आणि रणनीतिक महत्व मोठे असल्याने व भूतानसोबत संरक्षणात्मक दृष्ट्या मदतीचा करार झाल्याने भारत यापासून वेगळा होऊ शकत नाही. मात्र, चीनचे परराष्ट्र विभागाचा प्रवक्ता लूकांग यांचे म्हणणे आहे की, चीनकडून डोकलाम परिसरात जे काही बांधकाम सुरू आहे ते नियमाला धरूनच सुरू आहे. आम्हाला आमच्या भागाचा विकास करण्याचा अधिकार आहे. यामुळे स्पष्ट होते की, डोकलामची स्थिती अद्याप स्पष्ट नाही. मात्र असे असले तरी भारतीय सैनिकांनीही तेथे आपला तळ ठोकला आहे. 

 

काय आहे डोकलाम वाद?-

 

- खरं तर हे डोकलाम परिसरात चुंबी खोरे आहे जे तीन देशांच्या म्हणजेच भारत, भूतान आणि चीनच्या सीमारेषेवर आहे. 
- तेथे मागील काही दिवसापासून चीन सातत्याने आपली सक्रियता वाढविण्यासाठी रस्ते बांधत आहे. 
- भारत आणि चीनमध्ये 2 महत्त्वाची दारे, नाथू-ला आणि जेलप-ला येथूनच खुलतात. येथील खो-यात लष्करी कारवाया करणे खूपच अवघड काम आहे. 
- सिलीगुडी भागापासून सुमारे 50 किलोमीटर दूर आहे. काही ठिकाणापासून हा भाग केवळ 17 किलोमीटर रूंद आहे. 
- याचा बारीक आकार आणि संवेदनशील भाग म्हणून या भागाला भारताचा 'चिकन्स नेक' म्हणतात. 
- पश्चिम बंगाल स्थित हा भाग भारताची मुख्यभूमीला उत्तरपूर्वी राज्यांना जोडतो. 
- चुंबी खोरे केवळ भारतासाठी सामरिक दृष्टाच नव्हे तर, आंतराळ व्यवस्थेसाठी भारतासाठी खूपच महत्त्वाचे ठरते.
- चीन चुंबी खो-यातून भूतान सीमेवर अतिक्रमण करत राहतो. चुंबी खो-याच्या विकासासाठी केवळ सीमेच्या सुरक्षेच्या दृष्टीनेच नव्हे तर आतंराळ सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते.
- सिलीगुडी कॉरीडॉर चुंबी खो-याच्या अगदी बरोबर खाली वसलेले आहे. येथेच भारताने रस्ते बांधण्यास आक्षेप घेत म्हटले आहे की, येथे रस्ते बनविण्याची योजना म्हणजे पेइचिंगच्या संरक्षण दृष्ट्या रणनितीचा भाग आहे.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, डोकलामच्या चुंबी खो-यांचे महत्त्व व PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...