आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी 27 एप्रिलपासून दोन दिवस चीनच्या दौऱ्यावर; शी जिनपिंग यांची घेणार भेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ आणि २८ एप्रिलला चीनच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जातील. मोदी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत वुहान शहरात अनौपचारिक बैठक करतील. त्यात दोन्ही नेते द्विपक्षीय, आंतरराष्ट्रीय मुद्दे आणि परस्पर सहकार्य वाढवण्यावर चर्चा करतील. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी रविवारी बीजिंगमध्ये भेट घेतल्यानंतर चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी ही माहिती दिली. यी म्हणाले की, जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून मोदी वुहानच्या दौऱ्यावर येणार आहेत.

 

दोन्ही नेते भविष्यात चीन-भारत संबंधांबाबत दीर्घकालीन आणि रणनीतित मुद्द्यांवर चर्चा करतील. दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मोदींनी अभिनंदनाचा फोन केल्यामुळे दोघांतील विश्वास वाढला आहे.


स्वराज म्हणाल्या की, द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चेसाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा चीनचा हा चौथा दौरा असेल. त्यानंतर मोदी ९ आणि १० जूनला शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीसाठी चीनला जातील. सुषमा स्वराज एससीओच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी चीनला गेल्या आहेत. वांग यी यांना स्टेट कौन्सिलर आणि भारतीय सीमेशी संबंधित मुद्द्यांचा प्रमुख केल्यानंतर सुषमा यांच्याशी त्यांची ही पहिलीच भेट आहे.

 

बातम्या आणखी आहेत...