आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​जगातील सर्वात मोठ्या विमानाची चीनमध्ये झाली यशस्वी चाचणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- चीनने रविवारी जगातील सर्वात मोठ्या विमानाची यशस्वी चाचणी घेतली. हवा आणि पाण्यातूनही या विमानाचा वापर करणे शक्य आहे. झुहाई शहरातील हवाई तळावरून विमानाने उड्डाण केले. दुहेरी वापर करता येण्याजोगे हे जगातील सर्वात मोठे विमान असल्याचा दावा चीनच्या सरकारी विमान निर्मिती कंपनीने केला आहे. एजी ६०० -‘कुनलाँग’ असे या विमानाचे नाव. त्याचा आणीबाणीच्या परिस्थितीत मदतकार्य व लष्करी मोहिमांसाठी वापर केला जाईल. १७ डिसेंबर रोजीदेखील चीनने जेट सी ही प्रवासी विमान सेवा सुरू केली होती. 

 

- ३९.६ मीटर विमानाची लांबी
- ३८.८  मीटरचे पंखे 

बातम्या आणखी आहेत...