आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुषमा स्वराज यांनी घेतली शी जिनपिंग यांची भेट, म्हणाल्या- दोन्ही देशांनी एकमेकांशी भाषा शिकली पाहिजे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी शी जिनपिंग यांची सोमवारी भेट घेतली. - Divya Marathi
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी शी जिनपिंग यांची सोमवारी भेट घेतली.

बीजिंग - परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सोमवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. त्याआधी त्या म्हणाल्या की भारत आणि चीनच्या नागरिकांना एकमेकांच्या भाषेचे ज्ञान असले पाहिजे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 आणि 28 एप्रिल रोजी चीनच्या वुहान शहरात एका अनौपचारिक परिषदेत जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. चीन परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते लू काँग म्हणाले, की दोन्ही नेते सध्याच्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा करतील. 

 

भारत-चीनने एकमेकांची भाषा अवगत करावी - सुषमा स्वराज 
- परराष्ट्रमंत्री स्वराज म्हणाल्या, भारत आणि चीनच्या नागरिकांनी एकमेंकांची भाषा अवगत केली पाहिजे. यामुळे त्यांना चर्चेतील अडथळे दूर करता येतील. जेव्हा दोन मित्र भेटतात, बोलतात तेव्हा ते एकमेकांबद्दल चर्चा करतात. त्यांना काय हवे, काय नको हे जाणून घेतात. एकमेंकांना समजून घेण्यासाठी त्यांना भाषेची गरज असते. जेव्हा तुम्ही चीनी भाषेत बोलता तेव्हा ते मला कळाले पाहिजे आणि मी हिंदीत बोलत असताना ते तुम्हाला समजले पाहिजे. जर दोन मित्रांमध्ये दुभाषी बसला असले तर तो फक्त शब्दांचा अनुवाद करतो. भावना समजावून सांगू शकत नाही. भारत आणि चीनचे नाते दृढ होत आहे. अंतरराष्ट्रीय पातळीवरही आपण एकत्र काम करत आहोत. त्यामुळे तुम्ही हिंदी आणि आम्ही चिनी भाषा शिकणे गरजेचे आहे. 

बातम्या आणखी आहेत...