Home | International | China | worlds richest super village in china

अबब!!! या गावातील प्रत्येक व्यक्तीचे वर्षाला तब्बल 80 लाख रूपये उत्पन्न!

दिव्यमराठी वेब टीम | Update - Jan 22, 2018, 12:10 AM IST

चीनचे ‘सुपर विलेज’ आणि जगातील सर्वात श्रीमंत गाव म्हटले जाते.

  • worlds richest super village in china
    चीनमधील वाक्शी गावाला जगातील सर्वात श्रीमंत गाव म्हटले जाते.

    इंटरनॅशनल डेस्क- हे छायाचित्र आहे चीनमधील जियांगसू प्रॉविन्समधील वाक्शी गावाचे. याला चीनचे ‘सुपर विलेज’ आणि जगातील सर्वात श्रीमंत गाव म्हटले जाते. येथील सर्वाजवळ आपले घर, कार आणि भरपूस पैसा आहे. शांघायपासून 135 किमी दूरवर असलेल्या या गावात आज शेकडो कंपन्या आहेत तसेच मोठ्या प्रमाणात शेतीही केली जाते. एका व्यक्तीच्या प्रयत्नामुळे गाव बनले श्रीमंत...


    वर्षे 2014 मध्ये येथील प्रत्येक व्यक्तीचे वार्षिक सरासरी उत्पन्न 88 लाख रुपये एवढे होते. असेही नाही की हे गाव पहिल्यापासून श्रीमंत होते. 1961 मध्ये हे गाव खूपच गरीब होते. एकी व्यक्तीने केलेल्या प्रयनामुले या गावात समृद्धी येऊ लागली. ते होते कम्युनिस्ट पार्टीचे लोकल सेक्रेटरी वू रेनबाओ, ज्यांनी या समृद्धी प्लॅन बनवला व इंडस्ट्री आणली. त्यांनी कंपनीची स्थापना करून सामूहिक शेतीला प्रोत्साहन दिले.


    गावातील प्रत्येक व्यक्ती शेयर होल्डर-

    - 1990 च्या दशकात कंपनी लिस्टेड झाली आणि गावातील प्रत्येक व्यक्ती शेयर होल्डर बनला.
    - सध्या येथे 70 पेक्षा अधिक कंपन्या आहेत तसेच येथील प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात सरासरी 67 लाख रुपये जमा आहेत.
    - लोहा, सिल्क, चिप मेकिंग आणि पर्यटनातून 2012 मध्ये 64 हजार कोटी रुपयाचा इन्कम झाला.
    - गावातील बहुतेक घरे एकसारखीच आहेत. तसेच सर्व घरात 10-10 खोल्या आहेत. त्या जर तुम्ही पाहिल्या तर तुम्हाला हॉटेलपेक्षा कमी वाटणार नाहीत.
    - गावातील लोकांचे 80 टक्के उत्पन्न कराच्या रूपात जाते मात्र त्याबदल्यात अनेक मोफत सुविधा मिळतात.
    - यात लग्झरी विला, कार, हेल्थ केयर, फिरण्यासाठी हेलिकॉप्टर, लग्झरी हॉटेलात डिनर यासारख्या सुविधा मिळतात.
    - गावात 20 हजारांहून जास्त मजदूर काम करतात जे आसपासच्या गावातील लोक असतात.
    - 2013 मध्ये जग सोडून गेलेले रेनबाओ म्हणायचे, हाच खरा समाजवाद आहे जेथे 100 पैकी 98 लोक खूष राहतात.


    पुढे स्लाईड्सद्वारे फोटोतून पाहा या श्रीमंत गावाचा नजारा....

  • worlds richest super village in china
    50 वर्षापेक्षा जास्त वर्षाच्या महिलांना आणि 55 वर्षाच्या पुढच्या पुरुषांना येथे दर महिन्याला पेन्शन दिली जाते.
  • worlds richest super village in china
    येथे बंगला, कार पासून सुविधा मोफत मिळतात.
  • worlds richest super village in china
    हॉटेलपेक्षा कमी नाहीत येथील घरे, बंगले.
  • worlds richest super village in china
    याला चीनचे ‘सुपर विलेज’ आणि जगातील सर्वात श्रीमंत गाव म्हटले जाते.
  • worlds richest super village in china
    येथील सर्व घरांना 10-10 खोल्या आहेत.
  • worlds richest super village in china
    गावातील बहुतेक घरे आतून आणि बाहेरून एकसारखीच दिसतात.
  • worlds richest super village in china
    शहराच्या मधोमध असलेले लॉन्ग्झी इंटरनॅशनल हॉटेल
  • worlds richest super village in china
    हुआझी गावातील लॉन्ग्झी इंटरनॅशनल हॉटेल
  • worlds richest super village in china
    लॉन्ग्झी इंटरनॅशनल हॉटेल
  • worlds richest super village in china
    लॉन्ग्झी इंटरनॅशनल हॉटेलचे आतील नजारा...
  • worlds richest super village in china
    गावातील असलेले एयरपोर्ट
  • worlds richest super village in china
    एयरपोर्टवर हेलिकॉप्टरने प्रवास करणारे गावातील लोक...
  • worlds richest super village in china
    गावातील लोकांना मिळालेली घरे...
  • worlds richest super village in china
    गावातील नाजारा

Trending