Home | International | China | Chinas Advanced Hypersonic Missile Threat To India, US: Japan

चीनच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचा भारत, अमेरिकेला धोका : जपान

दिव्य मराठी | Update - Jan 03, 2018, 06:20 AM IST

चीनच्या नवीन हायपरसॉनिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे अमेरिकेच्या संरक्षणसिद्धतेस केवळ आव्हानच नाही तर हे क्षेपणास्त्र जपान

  • Chinas Advanced Hypersonic Missile Threat To India, US: Japan

    बीजिंग- चीनच्या नवीन हायपरसॉनिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे अमेरिकेच्या संरक्षणसिद्धतेस केवळ आव्हानच नाही तर हे क्षेपणास्त्र जपान आणि भारतातील लष्करी तळांचा अचूक निशाणा साधू शकते, असा इशारा प्रसारमाध्यमांच्या वृत्तात देण्यात आला आहे.


    टोकियोतील मुत्सद्देगिरीविषयक मासिकात चीनने गेल्या वर्षी हायपरसॉनिक ग्लाइड व्हेइकल(एचजीव्ही) अर्थात डीएफ-१७ च्या दोन चाचण्या घेतल्याचे नमूद केले आहे. यानंतर दक्षिण चायना मॉर्निंग पोस्टमध्ये वरील इशारा देण्यात आला आहे. अमेरिकी गुप्तचर सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या या वृत्तात पीपल्स लिबरेशन आर्मी(पीएलए) रॉकेट फोर्सने १ नोव्हेंबरला पहिली आणि त्यानंतरच्या दोन आठवड्यांनी दुसरी चाचणी घेतली. दोन्ही चाचण्या यशस्वी ठरल्या असून डीएफ-१७ २०२० मध्ये प्रत्यक्ष ताफ्यात समाविष्ट केले जाईल. चीनच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी या वृत्तावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. पारंपरिक क्षेपणास्त्रापेक्षा एचजीव्ही क्षेपणास्त्र अतिवेगाने लक्ष्य भेदण्यास सक्षम आहे.

Trending