आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णालयाचे पाडकाम; सुदैवाने रुग्ण बचावले, चौपदरीकरणासाठी चिनी आडमुठेपणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - विकास आणि रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी कोणती किंमत मोजायला हवी? चीनमध्ये चौपदरीकरणासाठी एका रुग्णालयाला अक्षरश: भुईसपाट करण्यात आले. तेदेखील इमारतीत रुग्ण, डॉक्टर आणि उपकरणे असताना. प्रशासनाच्या आडमुठेपणाचा सर्वांनाच फटका बसला. सुदैवाने प्राणहानी झाली नसली तरी अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. लाखो रुपये किमतीच्या उपकरणांचे नुकसान झाले.

हैनान प्रांतातील झेंग्झू विद्यापीठातील रुग्णालय क्रमांक-४ वर गुरुवारी बुलडोझर चालवण्यात आला. त्याची कोणतीही सूचना देण्यात आली नव्हती. रुग्णालयात रुग्ण आणि डॉक्टर होते. बुलडोझरचा आवाज ऐकून काही प्राण मुठीत घेऊन धावत सुटले. बुलडोझरमुळे सुमारे ४ कोटी रुपयांच्या उपकरणांचे नुकसान झाल्याचा दावा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी केला. रुग्णालयाच्या रेडिआेग्राफी विभागाचे संचालक लियू चुनगुआंग म्हणाले, मी एका रुग्णाची तपासणी करत होतो. त्याच वेळी बुलडोझर चालू लागला आणि भिंतीचा मोठा भाग कोसळला. रुग्ण अगाेदरच खूप घाबरलेला होता. तो तेथून पळून गेला. रुग्णालयातील सर्व काम ठप्प झाले.

रुग्णालयाची सिटी रूम आणि शवागार रस्ते विकासाच्या योजनेआड येत होते. रुग्णालयाला याबाबतची सूचना अनेक वेळा देऊन झाली होती, असा दावा स्थानिक प्रशासनाने केला. बुलडोझर चालवण्याच्या अगोदर रुग्णालय रिकामे करण्यात आले होते. त्यामुळेच घटनेत कोणीही जखमी झाले नाही. परंतु घटनास्थळी ढिगाऱ्याखाली काही मृतदेह मात्र जरूर अडकले आहेत, असे स्थानिक प्रशासनाचे म्हणणे आहे. बुलडोझर चालवण्यात येत होते. तेव्हा रुग्णालयात तीन डॉक्टर आणि काही रुग्ण होते. कारवाई रोखण्याच्या प्रयत्नात काही कर्मचारी जखमी झाले.
बातम्या आणखी आहेत...