आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा इसिस तळावरील हल्ल्याचे PHOTOS, US ने फेकला होता सर्वात मोठा बॉम्ब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शदल बाजार येथे दुकानांतील ढिगा-यावर अफगानी मुले.... - Divya Marathi
शदल बाजार येथे दुकानांतील ढिगा-यावर अफगानी मुले....
आचिन- अफगाणिस्तानातील आचिन जिल्ल्ह्यात शदल बाजारातील फोटोज समोर आले आहेत, जेथे अमेरिकेने दहशतवाद्यांच्या तळांवर गुरुवारी सर्वात मोठा बॉम्ब फोडला होता. घटनेच्या दोन दिवसानंतर स्थानिक लोक तेथील पाहणी करत होते. अफगाण-पाक सीमेवरील नांगरहार प्रांतात अमेरिकेने केलेल्या या हल्ल्यात इसिसच्या चार नेत्यांसह 94 दहशतवादी मारले गेले होते. तर, 11 सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
 
- समोर आलेल्या घटनास्थळावरील फोटोजमध्ये जो ढिगारे दिसत आहेत तेथे मुलगा खेळताना दिसत आहे. तर, अफगान सिक्युरिटीचे सुरक्षारक्षक ठिकाणाची पाहणी करताना दिसत आहे. 
- नांगरहार प्रॉविन्शियलचे गवर्नरचे स्पोक्सपर्सन अतुल्लाह खोगयानीने म्हटले होते की, सुरुवातीला 36 दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त होते.
- मात्र, नंतर डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अधिका-यांनी मृतांचा आकडा वाढल्याची माहिती दिली. यात इसिसच्या चार नेत्यांसह 94 दहशतवाद्यी मारल्याचे समोर आले. 
- आता हेलमंड प्रॉविन्सच्या अधिका-यांनी रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, 11 सामान्य नागरिकांचाही यात मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे.
 
एका सैनिकाच्या मृत्यूचा अमेरिकेने घेतला बदला-
 
अमेरिकेने पाकिस्तान बॉर्डरवरील नांगरहारमधील रिमोट एरियात एक टनल कॉम्प्लेक्सला निशाना बनवले होते, ज्यात 7 हजार इसिसच्या दहशतवाद्यांचा ठिकाणा होता. या ठिकाणावर अमेरिकेने गुरुवारी पहिल्यांदा 10 हजार किलोचा नॉन-न्यूक्लियर बॉम्ब GBU-43 टाकला होता. अमेरिकेने हा हल्ला आपल्या एका सैनिकांच्या मृत्यूचा बदला म्हणून केला होता. हा सैनिक मागील शनिवारी दहशतवाद्यांच्या विरूद्ध सुरु असलेल्या ऑपरेशनमध्ये शहीद झाला होता. 
 
'हल्ल्याला परवानगी देणे म्हणजे राष्ट्रद्रोह'-
 
- अफगाणिस्तानचे माजी प्रेसिडंट हामिद करजाई यांनी अमेरिकेने केलेल्या या हल्ल्याबाबत अफगाण सरकार आणि अमेरिकेवर टीका केली.
- काबुलमध्ये लोकांना संबोधित करताना करजाई म्हणाले की, अमेरिकेला हल्ला करण्यास परवानगी देणे म्हणजे राष्ट्रद्रोह आणि अफगाणिस्तानचा अवमान आहे.  
- तर, दुसरीकडे, राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या ऑपरेशनमध्ये यूएस मिलिट्री आणि अफगान सरकार यांच्यात चांगले को-ऑर्डिनेशन राहिले.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, शदल बाजारातील​ घटनास्थळाचे 8 फोटोज...
बातम्या आणखी आहेत...