Home »International »China» Ajit Dobhal Visit The Chinese Predident Xi Jinping Doklam

डोभाल यांनी घेतली चीन राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची भेट, डोकलाम वादामुळे दोन्‍ही देशांत तणाव

वृत्तसंस्था | Aug 07, 2017, 15:33 PM IST

  • डोभाल यांनी घेतली चीन राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची भेट, डोकलाम वादामुळे दोन्‍ही देशांत तणाव
बीजिंग-राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी शुक्रवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. ब्रिक्स राष्ट्रांचे एनएसएदेखील त्यांच्यासमवेत होते. भारत-चीन यांच्यात डोकलामवरून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली.

चीनमध्ये दोनदिवसीय ब्रिक्स बैठकीत ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सहभागी झाले होते. गुरुवारी डोभाल यांनी त्यांचे समकक्ष यांग जिईची यांची भेट घेतली होती. भारताने सीमेवरून सैन्यास माघारी घेतल्याशिवाय कोणतीही चर्चा निरर्थक आहे, असे चीनने म्हटले होते.
१६ जूनपासून डोकलाममधील तणावाला सुरुवात झाली आहे. तेव्हापासून चीनने चर्चा करणे टाळले आहे. सीमेवर भारताने डोकलाममध्ये सैन्य तैनाती केली आहे. त्यामुळे तणाव असल्याचा आरोप चीनने केला आहे. वास्तविक चीन व पाकिस्तान यांच्यातील सख्य वाढत चालल्यामुळे प्रदेशात नवीन प्रश्न निर्माण होत आहेत. चीनने डोकलाममध्ये भूतानच्या प्रदेशाजवळ रस्ते तसेच पायाभूत सुविधांचे काम हाती घेतले आहे. हे कराराचे उल्लंघन आहे.

Next Article

Recommended