आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: ड्रॅगन एम्परर म्हणतात चीनच्या पहिल्या सम्राटाला, एलियन्सशी आहे संबंधित!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील सात आश्चर्याबाबत तुम्हाला माहिती नक्कीच असेल. मात्र, आठवे आश्चर्याबाबत विचारले तर सर्वजणच माहित नाही असे सांगतील. मात्र असे सांगितले जाते की, अधिकृतपणे नाही पण चीनमझील टेराकोटा म्यूझियम जगातील आठवे आश्चर्य मानले जाते. या म्यूझियममध्ये 2 हजार वर्षाची जुनी 8000 सैनिकांची, 130 रथ, 520 घोडे आणि 150 घोडेस्वारांची प्रतिमा आहेत.
टेराकोटा आर्मीचा शोध 29 मार्च 1974 रोजी लागला होता. जेव्हा काही शेतकरी विहिर खोदत होते. त्यावेळी सैनिकाची वर्दी (ड्रेस) घातलेली प्रतिमा आढळून आली. याची माहिती मिळताच सरकारने या जागेच्या खोदाईचे काम सुरु केले तेव्हा हजारोंच्या संख्येने प्रतिमा आढळून आल्या. ज्याला आता टेराकोटा वॉरियर्स म्हटले जाते. चीन दौ-यावर गेलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वप्रथम टेराकोटा म्यूझियम पाहायला गेले.
काय आहे टेराकोटा आर्मी
प्रसिद्ध पर्यटन स्थळ शिआनमध्ये चीनचा पहिला सम्राट चिन शी हुआंगची हजारों वर्षापूर्वीची टेराकोटा आर्मी आहे जे जगातील आठवे आश्चर्य मानले जाते. याबाबत सांगितले जाते की, चिन शी हुआंग वयाच्या 12 व्या वर्षीच चीनचे शासक बनले होते. त्यांनी आपले सम्राज्याची सुरक्षेसाठी अशा एका आर्मीची स्थापना केली जी इतर कोणालाही भारी पडू शकेल. या सेनेला टेराकोटा आर्मी म्हटले जाते. एवढेच नव्हे तर हुआंग यांनी चीनची भिंत बांधली कारण इतरांचे चीनवर सहजासहजी आक्रमण होऊ नये म्हणून. या चीनवर पहारा देत चीनी सैनिक शत्रूंना सहज तोंड असत.
एलियनशी संबंधित तंत्र-
इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, स्वत:ला महान व अमर करण्यासाठी 7 लाख मजदूरांच्या मदतीने हे भूमिगत शहर तयार केले. ज्यानंतर या शहराला त्याने आपले समाधी स्थळ म्हणूनही निवडले. असे सांगितले जाते की, हुआंग यांचे शरीर येथील मकब-यात दफन केले आहे. मात्र उष्णता अधिक असल्याने या मकब-याची पूर्ण खोदकाम होऊ शकले नाही. या मकब-यासाठी जे तंत्र वापरले आहे ते एलियन तंत्रज्ञान म्हणून ओळखले जाते. सम्राट ही दुस-या ग्रहावरील लोकांपासून प्रभावित झाले होते.
ड्रॅगन एम्परर मानतात-
चीनचे पहिले सम्राट चिन शी हुआंग यांना ड्रॅगन एम्परर म्हटले जाते. यामागे अनेक दंतकथा आहेत. चीनी दंतकथानुसार, चीनमधील ड्रॅगनचे शरीर 9 वेगवेगळ्या जनावरापासून बनले होते. ज्यात ऊंटाचे डोके, माशाचे फुफ्फुस, हरणाचे शिंग, ससाचे डोळा, बैलाचे कान, सापाची गर्दन, क्लॅमचे पोट, वाघाचा पंजा आणि बाज पक्षाचे पंख आदींचा समावेश होता. हे भले मोठे राक्षस होते जे राज्याचे सुरक्षेसाठी व भल्यासाठी काम करायचे. त्यामुळेच हुआंगला ड्रॅगन एम्परर म्हटले जाते.
पुढे वाचा, टेराकोटा आर्मीवर बनला आहे चित्रपट...
बातम्या आणखी आहेत...