आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओठ तुटलेल्या बाळाला जमिनीत पुरले, ८ दिवसांनी जिवंत काढले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कियानडांग - चीनमध्ये महिनाभराच्या बाळाला जमिनीखालून जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे. एका रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. डॉक्टरांनी अंदाज वर्तवला की, या बाळाला आठ दिवसांपूर्वी लाकडी खोक्यात ठेवून त्याला जमिनीत पुरण्यात आले होते. ही घटना गुआंग्जी झुुआंग स्वायत्त क्षेत्रातील कियानडांग काउंटीमध्ये घडली आहे. चीनमधील सरकारी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जडीबुटी विकणारी महिला लू फेंगलियांगला जमिनीखालून मुलाच्या रडण्याचा आवाज आला. तिने ही माहिती जवळच्या बौद्ध मठातील ७५ वर्षीय भिक्खू झाओ शिमिन यांना दिली. त्यांनी पोलिसांच्या मदतीने तिथे खोदले असता पाच सेंटिमीटरवर एका खड्ड्यात लाकडी खोक्यात कपड्यात गुंडाळलेले मूल आढळले.
त्याला कमी खोलीवर पुरण्यात आल्याने कार्डबोर्डमुळे पावसाच्या पाण्याच्या ओलाव्यामुळे हे मूल आठ दिवसांनंतरही जिवंत राहिले असावे, असे डॉक्टरांनी सांगितले. या मुलाचे ओठ जन्मत:च तुटलेले आहेत. पोलिसांनी संशयावरून आई-वडील व नातेवाइकांना ताब्यात घेतले आहे."

पुढील स्लाइड करून पाहा, नवजात शिशुचे फोटो ...
बातम्या आणखी आहेत...