आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शी जिनपिंग यांनी केली बराक आेबामांची स्तुती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लीमा - चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक आेबामांची तारीफ केली आहे. त्यांच्या कार्यकाळात चीन-अमेरिका संबंधात व्यापकता व माधुर्य आल्याचे जिनपिंग म्हणाले. भविष्यातही उभय देशांमध्ये संबंध मजबूत होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. पेरूची राजधानी लीमा येथे अाशिया-पॅसिफिक देशांच्या परिषदेत जिनपिंग बोलत होते. दक्षिण चीन समुद्राविषयीच्या वादात सर्व देशांनी संयमाने भूमिका घ्यावी, असे आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांनी या वेळी केले.

राष्ट्राध्यक्ष म्हणून आेबामांची जिनपिंग यांच्याशी ही शेवटची भेट होती. शी जिनपिंग म्हणाले, अमेरिकेत सत्ता परिवर्तन झाले असून भविष्यातही उभय देशांचे संबंध मधुर राहतील अशी अपेक्षा आहे. जानेवारीत डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारतील. त्यांनी चीनविरोधी प्रखर टीका केली आहे. आेबामांनी पेरू येथील परिषदेत भावी राष्ट्राध्यक्षांविषयी उल्लेख करण्याचे टाळले.

चलनासंबंधी चीनचे धोरण दगाबाजीचे असल्याची टीका ट्रम्प यांनी केली होती. चिनी सामानावर आयात शुल्क वाढवले जाईल असेही आश्वासन त्यांनी दिले आहे. हवामान बदलाविषयीची चर्चा केवळ एक डाव असून बीजिंगला याचा लाभ व्हावा अशी चीनची इच्छा आहे, असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे. जिनपिंग यांनी ट्रम्प यांच्या कारकिर्दीत संबंधांत सुधारणा हेईल, अशी अपेक्षा आहे.
बातम्या आणखी आहेत...