आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bizarre Food Scams That Could Only Happen In China

मटण म्हणून विकतात उंदिर, कोल्ह्यांचे मांस, हे आहे चीनच्या बनावटी जगाचे सत्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताने चीनमधून आयात होणा-या दुग्धजन्य उत्पादनावर बंदी घातली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानुसार, खराब गुणवत्तेमुळे चिनी उत्पादनांबाबत निर्णय घेतला आहे. अनेकदा खाद्यपदार्थांच्या सुरक्षेवरुन चीन चर्चेत आला आहे. स्थानिक पातळीवर चीनची प्रतिमा आणखीनच मलीन आहे. 2008 मध्‍ये चिनी दुध घोटाळ्याने वाद माजवला होता. भेसळ दुध पिल्याने सहा मुलांचा मृत्यू झाला, तर 54 हजार मुलांना हॉस्पिटलमध्‍ये दाखल करावे लागले होते. जाणून घेऊ या, चीनने कोणते खाद्य उत्पादने बनवली नकली...
मटणाऐवजी खाऊ घालतात उंदिर आणि कोल्ह्याचे मांस
- चिनी खाद्यपदार्थ विक्रेते बनावट मटणही विकतात.
- येथे उंदिर, मुंगूस आणि कोल्ह्याचे मांस मटण सांगून विकले जाते.
- उंदीर, कोल्हा आणि इतर प्राण्‍यांच्या मांसात नायट्रेट, जिलेटिन आणि लाल रंग टाकून विकले जाते.
- 2013 मध्‍ये पोलिसांनी नकली मटन विक्री प्रकरणी तीन महिन्यांत 900 पेक्षा जास्त लोकांना अटक केली होती. या दरम्यान 20 हजार टनांपेक्षा अधिक नकली मटणही जप्त केले होते.
- चिनी पोलिसांनी सोशल नेटवर्किंग साइट वीबोवर नकली आणि असली मटनातील फरक सांगण्‍यासाठी ट्युटोरियल व्हिडिओही पोस्ट केला आहे.
- मात्र एकाच वेळी यात फरक सांगणे सोपे नाही. पण मटणाला घोळणे, घट्ट करणे आणि उकडवणे यामुळे लाल आणि पांढरा भाग वेगळा होत नाही. नकली मटणाबाबत असे होत असते.
पुढील स्लाइड्सवर वाचा, आणखी कोण-कोणत्या खाद्यपदार्थ चीनने नकली बनवले आहेत...