आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Blind Person's Could Travel With Their Trained Dog's In Train

अांधळ्यास "श्वाना'चा आधार, रेल्वे प्रवासात सोबत नेता येणार प्रशिक्षित श्वान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - आंधळ्याला काठीचा आधार ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. मात्र, चीनमधील अांधळ्यांच्या बाबतीत ही म्हण थोडी वेगळी ठरणार आहे. कारण, येथील अंधांना काठीचा नव्हे तर श्वानांचा आधार मिळणार आहे.
रेल्वे प्रवासादरम्यान अंधांना होणारा त्रास दूर कण्यासाठी चीनने त्यांना त्यांच्यासोबत प्रशिक्षित श्वान नेण्याची मुभा दिली आहे. हे श्वान अंधांसाठी आता "गाइड'ची भूमिका बजावतील. जगात चीनमध्ये अंधांची संख्या सर्वाधिक आहे. चीनसमोर त्यांच्या मदतीचे मोठे आव्हान आहे.
त्यामुळेच अंधांच्या मदतीसाठी आता हे नवे नियम लागू करण्यात आले आहे. नव्या नियमानुसार, रेल्वे प्रवासादरम्यान विशेष गाइडला सोबत घेऊन जायचे आहे की नाही, हे अंधांना आता तिकीट घेतेवेळी सांगावे लागेल. रेल्वे सुटण्याच्या १२ तास आधीपर्यंत अशी माहिती रेल्वे प्रशासनास कळवावी लागेल. जर अंधांना अाधी कळवण्यात अडचण आल्यास ते स्टेशनवर तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक सेवा केंद्रात संपर्क साधून या सेवेचा लाभ घेऊ शकतात.

५० लाख अंधांना फायदा
चीनमध्ये सध्या ५० लाखांपेक्षा जास्त अंध व्यक्ती आहेत आणि जगातील अन्य देशांच्या तुलनेत हे प्रमाण खूप जास्त आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे ही आकडेवारी पाहून शांत बसता येणार नाही. अशा विकलांग व्यक्तीना पूर्ण सुविधा द्यावी लागेल, असे चीनने स्पष्ट केले आहे. भारताप्रमाणेच चीनमध्येही रेल्वे हे वाहतुकीचे प्रमुख साधन आहे. २०१४ पर्यंत चीनमध्ये रेल्वेचे नेटवर्क १ लाख १२ हजार किलोमीटर अंतरापर्यंत पसरले होते. हा जगातील ितस-या क्रमांकाचा सर्वात मोठा रेल्वे नेटवर्क आहे.

मागच्या वर्षी अधिनियम मंजूर
चीनच्या रेल्वेने स्थानिक विकलांगता फेडरेशनसोबत एक अभ्यास केल्यानंतर ही सेवा देण्यासाठी नियमांत बदल केले आहे. याबाबतच्या अधिनियमास मागच्या वर्षी मंजुरी देण्यात आली होती. यानुसार आता रेल्वेस्टेशनमध्ये प्रवेश करताच अंधांना त्यांचे ओळखपत्र आणि अपंगत्व प्रमाणपत्र दाखवावे लागेल. यानुसार आगामी मे महिन्यापासून स्थानिक मेट्रो सेवेत अंध प्रवासी गाइड श्वान घेऊन जाऊ शकतील. हा नियम चीनमध्ये सर्वत्र लागू असणार आहे. जगातील एकूण दृष्टिहीनांपैकी १८ टक्के फक्त चीनमध्येच आहेत.