आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये दोन तोंडाचा नाग जन्मल्याने खळबळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग-दक्षिण चीनमध्ये एका नागांच्या संग्रहालयात दोन तोंडाचा नाग जन्मल्याने खळबळ उडाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा नाग २० सेंटीमीटर लांब असून त्याने कातही टाकली आहे. गडद भुरकट रंगाच्या या नागाची प्रकृती इतर नागांप्रमाणे उत्तम असल्याचे नानिंग प्राणीसंग्रहालयातील डॉक्टरांनी म्हटले आहे. या नागाच्या दोन्ही फण्यांमध्ये दोन मंेदू असून ते कोणत्याही दिशेला सहजपणे फिरतात. दोन तोंडाच्या नागांचे आयुष्य २० वर्षे असल्याचे आतापर्यंतच्या अभ्यासात सिद्ध झाले आहे. चीनमध्ये विषारी नाग व साप पाळले जातात. यासाठी अनेक लोकांनी खास सर्पपालन केंद्र उभारले अाहेत. या सापांच्या व नागांच्या कातडीपासून बॅग तयार केल्या जातात. तर, याचे मासही आवडीने खाल्ले जाते. या नागांच्या विषाचा उपयोग औषध निर्मितीमध्येही केला जातो.