आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Boss In Ferrari Leads Employees In Maseratis On Chinas Most Dangerous Highway

चिनी बॉसची आनंद साजरा करण्‍याची अजब त-हा, 20 कोटींच्या कार्स टाकल्या भंगारात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्‍या चीनमध्‍ये एका चिनी बॉसची बरीच चर्चा सुरु आहे. नी हॅशनने प्रथम आपल्या 10 कर्मचा-यांना लक्झरी स्पोर्ट्स मसराती गीबली कार भेट दिल्या. नंतर त्यांना भयावह रोड ट्रिपवर घेऊन गेला. यात सहा कारचा चुराडा झाला. चिनी सोशल नेटवर्किंग वेबसाइट वीबोवर या कारची छायाचित्रे व्हायरल झाली आहे. 5 कोटींच्या फेरारीत बसला होता बॉस, त्याचे झाले भंगार...
- हॅशन आपल्या कर्मचा-यांसह सिचुआन-तिबेट हायवे ट्रिपवर निघाला होता.
- 1 हजार 294 मैलचा हा प्रवास बराच धोकादायक आहे. यात बीहड भाग आणि खराब रस्त्यांना समोरे जावे लागते.
- या ट्रिपमध्‍ये हॅशन स्वत: 5 कोटींच्या फेरारी एफ-12 कारमध्‍ये बसला होता.
- त्याची फेरारी खडकाळ रस्त्यांवर धावू शकली नाही. कारचे टायर फुटले. रिम निखळले.
10 पैकी पाच मसरातींचेही नुकसान
- पर्वतीय रस्त्यांमुळे हॅशन भेट दिलेली 10 मधील पाच मसराती कारचे नुकसान झाले.
- काहींचे तर चेचिसही तुटले. परिस्थिती अशी झाली की त्या ट्रकमध्‍ये आणून जवळच्या गॅरेजमध्‍ये दुरुस्तीसाठी टाकण्यात आल्या.
- भारतात एका मसराती गीबली कारची किंमत 1.15 कोटी रुपये आहे.
कोण आहे हॅशन?
- हॅशन पूर्व चीनच्या झेजियांग प्रांताचा रहिवाशी आहे.
- त्याचा चिनी औषधी प्लास्टर्सचा व्यवसाय आहे.
- वीबोवर हॅशनच्या या ट्रिपवर चहुबाजूने टीका होत आहे.
- युजर्सच्या मतानुसार, हॅशन आपल्या संपत्तीचा देखावा करत आहे.
- हॅशनच्या तर्कानुसार, जर त्याने असे केले नसते तर त्याला कसे समजले असते, की त्याचा व्यवसाय चांगला चालू आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, ट्रिप दरम्यानची छायाचित्रे...