Home | International | China | Brahmaputra River : China Mulls 1000 Km Tunnel To Divert Brahmaputra

ब्रम्हपुत्रा नदीचा प्रवाह 1000 KM बोगदा तयार करून वळविणार असल्याची बातमी चुकीची : चीनचे स्पष्टीकरण

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 31, 2017, 02:37 PM IST

बीजिंग/नवी दिल्ली - चीनने आपल्या दुष्काळी शिनजियांग प्रांताला कॅलिफोर्नियासारखे करण्याची तयारी सुरु केली आहे.

 • Brahmaputra River : China Mulls 1000 Km Tunnel To Divert Brahmaputra
  बीजिंग/नवी दिल्ली - चीनने आपल्या दुष्काळी शिनजियांग प्रांताला कॅलिफोर्नियासारखे करण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी ब्रम्हपुत्रा नदीचा प्रवाह ते शिनजियांगकडे वळविणार आहे. बीजिंग 1000 किलोमीटर लांबीची बोगदा तयार करणार आहे. या बोगद्यातून हे पाणी शिनजियांगकडे नेण्याचे नियोजन चीनने केले आहे. चीनी अभियंत्यांचे सध्या या प्रकल्पावर काम सुरु आहे. काही चाचण्याही घेतल्या जाताहेत. बीजिंगच्या या निर्णयावर पर्यावरणतज्ज्ञांसह भारताने चिंता व्यक्ती केली आहे. कारण, असे झाल्यास हिमायलयावर त्याचे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. माध्यमांमध्ये आलेल्या या बातमीनंतर फॉरेन मिनिस्ट्रीची स्पोक्स पर्सन हुआ चुनयिंग हिने ही बातमी चुकीची असल्याचे स्पष्टीकरण दिले.
  सर्वात उंच पठारातून निघेल हा बोगदा
  न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, हाँगकाँगच्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने सोमवारी एका अहवालात चीनच्या या प्रकल्पाचा खुलासा केला. यानुसार हा बोगदा जगातील सर्वाधिक उंचावरील पठारावरून हा बोगदा नेण्यात आला आहे. यापैकी बरेच भाग एकमेकांशी जोडलेले आहेत. या बोगद्यामुळे चीनमधील सर्वाधिक दुष्काळी भाग शिनजियांगमध्ये पाणी मिळणार आहे.
  पाणी वाहून नेणारा सर्वात मोठा बोगदा
  चीन लियॉनिंग प्रोविंग वॉटर प्रोजेक्ट अंतर्गत 85 किलोमीटर अंतराचा पाणी वाहून नेणारा दाहूओफांग बोगदा तयार करण्यात आला आहे. त्यानंतर न्यूयॉर्कमध्ये जगातील सर्वात मोठा पाणी वाहून नेणारा बोगदा 137 किलोमीटर लांबीचा आहे.
  100 वैज्ञानिकांनी तयार केला ड्राफ्ट
  - तिब्बत-शिनजियांग दरम्यान पाण्याचा बोगदा तयार करण्यासाठी 100 वैज्ञानिकांची टीम तयार करण्यात आली होती. या टीमने देशभरात रिसर्च करून या प्रकल्पाचा ड्राफ्ट तयार केला. त्यानंतर ऑगस्ट 2017 पासून हा बोगदा तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
  - वैज्ञानिकांच्या मते, ब्रम्हपुत्रा नदीचे पाणी वळवून शिनजियांगकडे वळविण्यात येणार आहे.
  1 नदी, 3 नावे
  साउदर्न तिब्बतमध्ये ब्रम्हपुत्र नदीला यारलुंग तसांगपो नावाने ओळखले जाते. कैलाश पर्वत आणि मानसरोवरच्या साऊथ-वेस्टच्या तमलुंग त्सो येथून निघते. तिब्बतपासून ही नदी भारताच्या अरुणाचल प्रदेशात जाते. याठिकाणी ही नदी इसेसियांग नावाने ओळखली जाते. पुढे ही नदी मोठी होऊन या नदीचे नाव ब्रम्हपुत्र असे होते.
  ब्रम्हपुत्रा नदीवर चीनने तयार केले आहेत अनेक धरण
  यारलुंग तसांगपो नदीचे पाणी भारत आणि बांगलादेश वापरतात. त्यामुळे नवी दिल्लीने चीनच्या या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे. ही नदी चीन आणि भारतातून वाहते. मात्र चीन या नदीवर सातत्याने हक्क सांगतो. यापूर्वी चीनने या नदीवर अनेक धरण तयार केले आहेत. आता या नदीचे पाणी थेट शिनजियांगकडे वळविले जाणार आहे.
  ही आहे भारताची चिंता
  ब्रम्हपुत्रा नदीचा प्रवाह बदलून चीनला हे पाणी वापरायचे आहे. या नदीवर तयार करण्यात आलेले धरणांवर भारताने सातत्याने विरोध केला आहे. भारतीय पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, उत्तराखंड मध्ये झालेल्या प्रलयासाठी चीन जबाबदार आहे. यामध्ये हजारो नागरिकांचे जीव गेले. आता हा बोगदा तयार केल्यास हिमालयाला मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. कदाचित त्याचे वाईट परिणाम भारताला भोगावे लागतील.

 • Brahmaputra River : China Mulls 1000 Km Tunnel To Divert Brahmaputra

Trending