आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये झिजियांग राज्यात भूस्खलनातील बळींची संख्या १६ वर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - पूर्व चीनच्या झिजियांग प्रांतातील भूस्खलनातील बळींची संख्या १६ वर पोहोचली आहे. अद्याप २१ जण बेपत्ता असल्याचे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. शुक्रवारी रात्री दरड कोसळल्याच्या घटनेनंतर केवळ एका नागरिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याक्सी शहराजवळील लिडोंग गावात ही दुर्घटना घडली. चिखल आणि ढिगाऱ्याखाली २७ घरे गडप झाली. २१ घरांतील ३०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. जीवितांच्या शोधासाठी २३०० बचाव कर्मचारी आणि सात श्वान घटनास्थळावर आहेत. हवामानाचा मदतकार्यावर परिणाम होत आहे.