आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये ‘चान-होम’ धडकले, १० लाख बेघर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - शक्तिशाली वादळ चान-होमने शनिवारी चीनला जबर हादरा दिला. दक्षिणेकडील भागात ताशी २०० किमी वेगाने वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे सुमारे १० लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. झेजियांग प्रांतातील अनेक शहरे काळोखात बुडाली. वादळामुळे १०० हून अधिक रेल्वे ठप्प झाल्या होत्या. ५० हजारांहून अधिक मच्छीमारांना माघारी बोलावण्यात आले. १९४९ नंतरचे हे सर्वात प्रलयंकारी वादळ मानले जाते. वेनलिंग शहराच्या किनारपट्टीवर शनिवारी विशाल लाटा उसळताना दिसून आल्या. काही भागात ३० सेंटीमीटर पर्यंत पावसाची नोंद झाली. वादळाने जपानच्या आेकिनावा बेटांच्या समुहाला आणि तैवानला देखील तडाखा दिला आहे.