आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China Against Terrorism, Syllabus Start In School And College

चीनमध्ये दहशतवादाला विरोधी अभ्यासक्रम, पदवी व पदव्युत्तरमध्ये समावेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- दहशतवादाच्या विरोधात जनजागृतीच्या उद्देशाने चीनमध्ये आता विद्यार्थ्यांना धडे दिले जाणार आहे. यासाठी चीन सरकार महाविद्यालय सुरू करण्याच्या विचारात आहे. या महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर स्तराचे दहशतविरोधी अभ्यासक्रम शिकवले जातील. नॉर्थवेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ पॉलिटिक्स अँड लॉशी संलग्नित हे महाविद्यालय उत्तर पश्चिम प्रांतातील शांक्शीमध्ये सुरू होणार आहे. सुरुवातीला अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांचा कल पाहून नंतर यात डॉक्टरेट स्तरावरचे शिक्षणही उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रवेशप्रक्रिया राबवली जाणार आहे. विशेष म्हणजे, विधीसंबंधित पदवीधरांना या प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाईल. चीनच्या संसदेत मागच्या महिन्यातच दहशतवादविरोधी कायदा संमत करण्यात आला असून १ जानेवारीपासून तो लागू झाला आहे.
या कायद्यांतर्गत सुरक्षा दलांना व्यापक अधिकार बहाल करण्यात आले आहेत. आता चीनमधील सुरक्षा दल दहशतवादविरोधी घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कधीही कोणत्याही भागात तपासणी करू शकतील. शिवाय, या कायद्यात माध्यमांवर नियंत्रण ठेवण्याचीही व्यवस्था आहे. यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्यांची स्वतंत्र नियुक्ती
केली जाईल.