आंतरराष्ट्रीय डेस्क - चीनने पाण्यात सर्वात जास्त वेगाने चालणारा रणगाडा (अॅम्फिबियस आर्म्ड व्हेइकल) तयार केला आहे. चिनी माध्यमांच्या दाव्यानुसार, हा समुद्रात तरंगणारा रणगाडा असून त्याची स्पीड शांत पाण्यात 50 किमी प्रतितास एवढी आहे. अशा रीतीने चीनने पाण्यात चालणाऱ्या लष्करी वाहनांच्या बाबतीत अमेरिकेला मागे टाकले आहे. कारण अमेरिकेच्या अशाच वाहनांची स्पीड 10-12 किमी प्रतितास आहे.
शत्रूचा कर्दनकाळ ठरेल हा रणगाडा
- या वाहनाला नॉर्थ चीन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेइकल रिसर्चने तयार केले आहे.
- चिनी माध्यमांनुसार, सध्या या रणगाड्यावर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे बसवण्याचे काम सुरू आहे.
- सुधारणेनंतर यात घातक अस्त्रेही बसवली जातील. जी शत्रूच्या जहाजांसाठी कर्दनकाळ ठरू शकतात.
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा या अदभुत रणगाड्याचे आणखी काही फोटोज...