Home »International »China» China Blames Ajit Dobhal For Doklam Controversy

डोकलाम वादामागे एनएसए अजित डोभाल यांचे षड्यंत्र, ‘ग्लोबल टाइम्स’ चा आरोप

वृत्तसंस्था | Jul 26, 2017, 03:00 AM IST

  • डोकलाम वादामागे एनएसए अजित डोभाल यांचे षड्यंत्र, ‘ग्लोबल टाइम्स’ चा आरोप
बीजिंग-डोकलाम वादाचे मुख्य षडयंत्र भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचे आहे. त्यामुळेच डोभाल यांच्या चीन दौऱ्याचा वाद सोडवण्यासाठी काहीही उपयोग होणार नाही, असे चिनी सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. हा प्रश्न शांततेने सोडवण्याची अपेक्षा चिनी वृत्तपत्राने व्यक्त केली आहे.
चालू आठवड्यात ब्रिक्स एसएसएच्या चीनमध्ये होणाऱ्या बैठकीत सहभागी होण्यासाठी डोभाल चीन दौऱ्यावर जाणार आहेत. २७ ते २८ जुलै दरम्यान होणाऱ्या बैठकीत ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचे एनएसए सहभागी होतील. डोभाल आपले समकक्ष येन जेइची यांच्याशी सीमावादाच्या मुद्द्यावर चर्चा करणे अपेक्षित आहे. डोभाल यांच्या दौऱ्यावर सीमा वादाची समस्या सुटेल, असे वाटत नाही. सीमेवरून भारतीय सैन्य हटवले जात नाही, तोपर्यंत ही समस्या सोडवण्याचा भ्रम भारताने बाळगू नये, असे या वृत्तपत्राने नमूद केले आहे.

सैनिक माघारी घ्यावे : वांग यी
सीमा वादासाठी भारत जबाबदार आहे. म्हणून भारताने सैनिक माघारी घ्यावे, असे चिनचे परराष्ट्र मंत्री वाँग यी यांनी मंगळवारी म्हटले आहे. भारताने डोकलाम भागातून आपले सैन्य मागे बोलवावे. चीनचे सैन्य भारतीय सीमेत घुसले नसल्याचे भारतीय अधिकाऱ्यांनी स्वीकारल्याचा दावाही यी यांनी केला आहे. खरे आणि खोटे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता भारताने सैन्य माघारी घेतले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

Next Article

Recommended