आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China Blows Up A 26 Storey High Rise With Tonnes Of Dynamite

चीन: 15 सेकंदात डायनामाइटने उडवले सर्वात उंची इमारत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनच्या शियान शहरात रविवारी 387 फुट लांबी आणि 26 मजली एक इमारत डायनामाइटने जमीनदोस्त करण्‍यात आले. इमारत जमीनदोस्त व्हायला केवळ 15 सेकंद लागली. संबंधित इमारत ही चीनमधील सर्वात उंच इमारत आहे. ती पाडण्‍यासाठी 1.4 डायनामाइट आणि 12 हजार डेटोनेटर्स लावली गेली होती.
16 वर्षांपूर्वी बांधण्‍यात आली होती इमारत
ही इमारत 16 वर्षांपूर्वी जिन्हुआ फार्मसी कारखान्याच्या कार्यालयासाठी बांधण्‍यात आली होती. तिचे बांधकाम 1996 मध्‍ये बांधकाम सुरु झाले आणि 1999 मध्‍ये पूर्ण झाले होते. मात्र मालकाने तिचा कधीच वापर केला नाही. इमारत पाडल्याने चिनी माध्‍यमे भलतीच नाराज आहेत.
होणार व्यावसायिक संकुल :
आता या ठिकाणी नवे व्यावसायिक संकुल उभारले जाणार आहे. पीपल्स डेली ऑनलाइनच्या मतानुसार स्फोटानंतर इमारतीचा ढिगारा 66 फुटापेक्षा जास्त झाला होता. स्थानिक प्रशासनाने ढिगा-याची विल्हेवाट हलवण्‍यासाठी 70 दिवस मागीतले आहे.