Home »International »China» China Clear His Stand About Kashmir Issue

यांच्यावर खार खातात चिनी लोक, पाहा कशा आहेत 'उइगर' समाजाच्या वुमन्स

दिव्यमराठी वेब टीम | Apr 20, 2017, 09:36 AM IST

  • उइगर ब्यूटीज (डावीकडून उजवीकडे) - दिलनाज, मेदिना, आणि आइदा.
इंटरनॅशनल डेस्क- पाक व्याप्त काश्मीरमधून जाणाऱ्या आर्थिक प्रकल्पाचा काश्मीर प्रश्नाशी थेट संबंध नाही. चीन-पाकिस्तान यांच्यातील इकॉनॉमिक कॉरिडॉरचा (सीपीईसी) फायदा भारतालाही होईल, असे चीनने म्हटले आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखालील ‘एक प्रदेश, एक मार्ग’ धोरणाचे भारताने स्वागत केले आहे. त्यानंतर चीनने ही भूमिका घेतली आहे. या प्रकल्पात आम्ही भारताचे स्वागत करतो. भारताने त्यात सहभागी झाल्यास एक प्रदेश, एक मार्ग ही संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकेल, असे चीनने म्हटले आहे. ओबीओआर असे या अब्जावधी डॉलर्सच्या सिल्क रोड प्रकल्पाचे नाव आहे. शेजारी देशांच्या विकासासाठी चीनने आपले योगदान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने सीपीईसीकडे पाहिले पाहिजे. बांगलादेश, चीन, भारत, म्यानमार यांचा समावेश असलेल्या बीसीआयएम प्रकल्पात भारताचा सहभाग आहे. ही अतिशय सकारात्मक बाब असल्याचे चीनने यानिमित्ताने मान्य केले. त्याशिवाय २८ देशांचा समावेश असलेल्या अन्य एका प्रकल्पासाठीदेखील आम्ही प्रयत्नशील असल्याचे चीनने सांगितले.
एकीकडे, भारत, चीन विकासाच्या मुद्यांवर अनेकदा एकत्र येत असले तरी दहशतवाद, सामाजिक स्थैर्य याबाबत मात्र एकमेंकांच्या विरोधात उभे ठाकत आहे. मग विषय जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या आणि मुंबईसह पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड मौलाना मसूद अझहरला संयुक्त राष्ट्राकडून (UN) दहशतवादी ठरविण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चीन खीळ घालतो. तर भारत याचा बदला म्हणून वर्ल्ड उइगर काँग्रेस (WUC) नेता डोल्कन ईसा याला व्हिसा देतो. डोल्कन ईसा या नेत्याला चीन दहशतवादी मानते. भारताने ईसाला व्हिसा दिल्यानंतर चीन चिडला होता. त्यामुळे चीनमधील उइगर मुस्लिम चर्चेत आले होते. चिनच्या शिंजियांग प्रांतात उइगर मुस्लिम बहुसंख्याक आहेत. उइगर समाजाच्या महिला आणि मुली त्यांचे सौंदर्यामुळे जगभर ओळखल्या जातात. उइगर महिला या बहुतेक डान्सर, मॉडेल आणि अभिनयाच्या क्षेत्रात असतात, त्यामुळे जगात त्यांचा चाहता वर्गही मोठा आहे.
कोण आहे उइगर मुस्लिम-
- उइगर हे तुर्की मुस्लिम आहेत. शिंजियांग प्रांतात त्यांची संख्या 45% पेक्षा जास्त आहे.
- उइगर मुस्लिम स्वतःला चीनी वंशाचे मानत नाहीत. त्यांची भाषा तुर्की आहे.
- चीन, पाकिस्तानवर उइगर मुस्लिमांना चिथावणी देण्याचा आरोप करत आले आहे.
- चीन सरकारचा दावा आहे, की पाकिस्तानातील काही भागात उइगर मुस्लिमांना दहशतवादी कारवायांची ट्रेनिंग दिली जाते.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, TOP 10 मोस्ट ब्युटीफुल उइगर मुस्लिम वुमन्सचे PHOTOS...

Next Article

Recommended