आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमधील ‘एक मूल’ योजना बंद, दोन मुलांच्या जन्मास परवानगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनमध्ये आता दोन मुले जन्माला घालण्यास कायद्याने मान्यता मिळाली आहे. ३६ वर्षांपासून सुरू असलेल्या कुटुंब कल्याण योजनेला (एक मूल) सरकारने गुंडाळताना चिनी दांपत्यांना दोन मुलांचे अधिकार दिले आहेत; परंतु त्यापेक्षा अधिक मुलांसाठी परवानगी नाही.
खरे तर चीनमध्ये गेल्या काही वर्षांत एक मूल योजनेतही विशिष्ट अटींवर काही दांपत्यांना दोन मुलांना जन्म देण्याची मुभा होती; परंतु देशात वयोवृद्धांची संख्या वाढत होती. त्यामुळे काही दशकांपूर्वीच्या धोरणाला रद्द करण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेण्यात आला होता. चीनचा सत्ताधारी पक्ष कम्युनिस्ट पार्टीने गत ऑक्टोबरमध्ये दोन मूल धोरणाला प्रत्यक्षात आणण्याची घोषणा केली होती.

डिसेंबरअखेर देशाच्या संसदेने त्यावर शिक्कामोर्तबही केले होते. लोकसंख्येत चीनचा क्रमांक जगात दुसरा लागतो. पूर्वीच्या धोरणामुळे देशात ४० कोटी मुलांच्या जन्मावर नियंत्रण आणणे शक्य झाले आहे. वास्तविक, हा आकडा वादग्रस्त आहे. २१ व्या शतकात महासत्ता होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या चीनसमोर लोकसंख्येची मोठी समस्या आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही.

१९७८ मध्ये एक मूल धोरण
चीनमध्ये१९७० च्या दशकात देशाची लोकसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी एक मूल धोरण लागू करण्यात आले होते. त्या वेळी देशाची लोकसंख्या अब्जाहून अधिक झाली होती. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल, यावरून चीन सरकार चिंतित झाले होते. त्यामुळेच चीनचे नेते डेंग जियाआेपिंगने १९७८ मध्ये एक मूल धोरणाचा प्रस्ताव मांडला होता. नंतर त्याची अंमलबजावणी झाली होती.