आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China Evacuates Over One Million Ahead Of Typhoon

सर्वांत मोठ्या वादळाने चीन हादरला; तब्‍बल 11 लाख लोक झाले विस्‍तापित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वादळामुळे चीनच्‍या समुद्र किना-यावर अशा उंचच उंच लाटा उसळल्‍या आहेत. - Divya Marathi
वादळामुळे चीनच्‍या समुद्र किना-यावर अशा उंचच उंच लाटा उसळल्‍या आहेत.
शंघाई (चीन) – चीनमधील झेजियांग आणि झियांगसू प्रांतात आज (रविवारी) चान-होम नावाचे प्रचंड मोठे वादळ आले. त्‍यामुळे तब्‍बल 11 लाख व्‍यक्‍तींनी आपले घर सोडून सुरक्षित स्‍थळाकडे धाव घेतली; तर विमान, रेल्‍वे आणि दळण-वळण, फोन अशा सर्वच सुविधा ठप्‍प झाल्‍यात. 1949 नंतर चीनमध्‍ये आलेले हे सर्वात मोठे वादळ आहे.
झेजियांग प्रांताच्‍या प्रशासनाने सांगितले, वादळामुळे 410 मिलियन डॉलरचे ( जवळपास 2590 कोटी रुपये) नुकसान झाले आहे. हे वादळ काल (शनिवारी) शंघाईच्‍या दक्षिण समुद्र किना-यावर भिडले. यावेळी हवेचा वेग 160 किलोमीटर प्रति तास होता.
वीजपुरवठा बंद, ट्रांसपोर्ट ठप्‍प
जेझियांग प्रांतातील बहुतांश शहरात आणि गावांमध्‍ये वादळामुळे वीज पुरवठा बंद बंद झाला तर दळण-वळण ठप्‍प झाले आहे. 100 पेक्षा अधिक ट्रेन अापल्‍या जाग्‍यावर उभ्‍या आहेत. मच्‍छीमारांच्‍या 50 हजार होड्या परत बोलवाल्‍यात. समु्द्र किना-यावर मोठ मोठे लाटा उसळत असून, काही भागात मुसळधार पाऊससुद्धा पडत आहे. शंघाईच्‍या पुडोंग अंतरराष्ट्रीय विमानतळावरून 500 पेक्षा जास्‍त विमान उड्डाण रद्द करण्‍यात आले आहेत.
जापान आणि तायवानसुद्धा फटका
वादळामुळे जापानच्‍या ओकिनावा द्वीप श्रृंखला आणि तायवानही प्रभावित झाला आहे. शुक्रवारी वादळामुळे तायवानची राजधानी तायपेमध्‍ये सरकारी सुटी घोषित करण्‍यात आली होती.