आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवाला यातना देणार्‍या अवजारांचा चीन मोठा उत्पादक, जगभर होते निर्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानवाला यातना देणार्‍या (टॉर्चर टुल्स) अवजारांच्या निर्मीतीत चीन अग्रक्रमावर आहे. - Divya Marathi
मानवाला यातना देणार्‍या (टॉर्चर टुल्स) अवजारांच्या निर्मीतीत चीन अग्रक्रमावर आहे.
इंटरनॅशनल डेस्क- मानवाला यातना देणार्‍या (टॉर्चर टुल्स) अवजारांच्या निर्मीतीत चीन अग्रक्रमावर आहे. ते या अवजारांची निर्यात आफ्रिका आणि आशियातील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात करतात. विशेष म्हणजे या देशांमध्ये मानवाधिकाराची स्थिती आधीच खालावलेली आहे. अ‍ॅमनेस्टी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार या अवजारांची निर्मीती करणार्‍या कंपन्यांमध्ये चीनची सरकारी कंपनी देखील आहे.
 
130 हून अधिक कंपन्यांमध्ये टॉर्चर टुल्सची निर्मीती-
 
चीनमध्ये यातना देणार्‍या अवजारांची निर्मीती करणार्‍या 130 हून अधिक कंपन्या आहेत. तिथे इलेक्ट्रिक शॉक देणारी छडी, काट्यांचा दांडा आणि पायांना जोडणार्‍या क्लिपची निर्मीती केली जाते. यातील काही कंपन्या या अवजारांची खुली विक्री करतात हे सर्वाधिक आश्चर्यजनक आहे.
 
अफ्रिका आणि आशियात होते निर्यात-
 
अ‍ॅमनेस्टी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार चीनमध्ये निर्मीती होत असलेल्या टॉर्चर टुल्सची निर्यात मानवाधिकारचे हनन मोठ्या प्रमाणात होत असलेल्या आफ्रिका आणि आशिया देशांमध्ये होत आहे. या अवजारांनी मानवाधिकार पायदळी तुडवण्याच्या घटनांना प्रोत्साहन मिळत आहे, आणि त्यांचा हिंसेसाठी वापर होत आहे. अहवालात म्हटले आहे, 'यातील काही अवजारांचा वापर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केला जातो. मात्र, त्याचा सर्वाधिक वापर मानवतेला काळीमा फासणार्‍या घटनांसाठीच होतो.'

अहवालात म्हटल्यानुसार, चीनची एक कंपनी चायना जिंग इम्पोर्ट-एक्स्पोर्ट कॉर्पोरेशन थंब कफ (हातांना बांधणारे टुल्स) आणि इलेक्ट्रिक स्टेन गन यांची जाहिरात करते. कंपनीचा दावा आहे, की त्यांचा माल आफ्रिकेतील 40 देशांमध्ये निर्यात होतो.
 
युगांडा आणि कांगो येथे झाला वापर-
 
2011 मध्ये युगांडा येथे विरोधकांचे आंदोलन दडपण्यासाठी चीनी टॉर्चर टुल्सचा वापर झाला होता. या आंदोलनात 9 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक जखमी झाले होते. त्याशिवाय 2011 मध्येच कांगो येथे निवडणुकीदरम्यान विरोध प्रदर्शन करणार्‍यांना नियंत्रित ठेवण्यासाठी चीनी बनावटीच्या टुल्सचा वापर झालो हाता, त्यात 33 लोकांचा मृत्यू झाला होता.
 
चीनची प्रतिक्रिया-
 
अ‍ॅमनेस्टी इंटरनॅशनलच्या अहवालाशी संबंधीत संशोधक पॅट्रिक बिल्कन म्हणतात, चीनचा हा व्यापार माफी योग्य नाही. याउलट चीनच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने अ‍ॅमनेस्टी इंटरनॅशनल्या विश्वासार्हतेवरच प्रश्न उपस्थित केला आहे. चीनचे प्रवक्ते म्हणाले, 'ही आंतरराष्ट्रीय संस्था सुरवातीपासूनच चीनबद्दल आकसबुद्धीने वागत आली आहे. आम्हाला त्यांच्या विश्वासार्हतेवरच शंका आहे.'
 
पुढील स्लाईडमध्ये पाहा, चीनमध्ये कोणकोणत्या टॉर्चर टुल्सची निर्मीती होते, ज्यामुळे मानवाधिकाराची पायमल्ली होते...
बातम्या आणखी आहेत...